Lokmat Money > बिझनेस न्यूज > टोमॅटोंच्या चटणीसह केचअपची मागणी वाढली

टोमॅटोंच्या चटणीसह केचअपची मागणी वाढली

टोमॅटोंचे वाढलेले भाव बघता ताटातील जेवणाची चव कायम राखण्यासाठी लोक टोमॅटोची चटणी, केचअप, सॉस इत्यादी उत्पादनांना प्राधान्य देत आहेत. यामुळेच या उत्पादनांना

By admin | Published: November 21, 2015 02:41 AM2015-11-21T02:41:12+5:302015-11-21T02:41:12+5:30

टोमॅटोंचे वाढलेले भाव बघता ताटातील जेवणाची चव कायम राखण्यासाठी लोक टोमॅटोची चटणी, केचअप, सॉस इत्यादी उत्पादनांना प्राधान्य देत आहेत. यामुळेच या उत्पादनांना

Catcup demand was increased with tomato chutney | टोमॅटोंच्या चटणीसह केचअपची मागणी वाढली

टोमॅटोंच्या चटणीसह केचअपची मागणी वाढली

मुंबई : टोमॅटोंचे वाढलेले भाव बघता ताटातील जेवणाची चव कायम राखण्यासाठी लोक टोमॅटोची चटणी, केचअप, सॉस इत्यादी उत्पादनांना प्राधान्य देत आहेत. यामुळेच या उत्पादनांना बाजारात मागणी वाढली आहे.
उद्योग मंडळ असोचेमने केलेल्या पाहणीत म्हटले आहे की, ‘टोमॅटोे, कांदे आणि आल्याचे भाव वाढल्यामुळे जवळपास ७२ टक्के मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यमवर्गीयांना महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ घालणे अवघड झाले आहे.’
ही पाहणी मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद व हैदराबादसारख्या शहरांत एक हजार गृहिणींकडे करण्यात आली. वाढलेल्या किमतीचा मोठा परिणाम हा राजधानी दिल्लीत व त्यानंतर अहमदाबाद व मुंबईत दिसला.
असोचेमचे महासचिव डी.एस. रावत म्हणाले की, ‘पाहणीत कमी उत्पन्न गटातील ७२ टक्के कुटुंबांनी टोमॅटोचा वापर बंद करून खर्च टाळला आहे. भाज्यांचे भाव वाढल्यामुळे टोमॅटोंची चटणी, केचअप, आले व लसणाची पेस्ट आदी तयार पदार्थांच्या मागणीत २०-२५ टक्के वाढ झाली आहे.’
दिल्लीच्या बाजारात महिनाभरापूर्वी टोमॅटो ४० रुपये किलो होते. ते आज ६५ रुपयांवर गेले आहेत. देशाच्या प्रमुख शहरांत महिनाभरापूर्वी ३० रुपये किलोचे टोमॅटो सरासरी ५५ रुपयांवर गेले आहेत. कांद्याचा भाव किलोला आठड्यापूर्वी ३६ रुपये होता. तो आज ३७.५२ रुपये किलो झाला.

Web Title: Catcup demand was increased with tomato chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.