Join us

कोचर यांच्याबाबत केंद्र सरकारचा सावध पवित्रा, तूर्त पद सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 1:33 AM

व्हिडीओकॉनच्या ३,२५0 कोटींच्या कर्ज घोटाळ्याच्या कारणामुळे आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरीत असली तरी या मुद्द्यावर मोदी सरकारने सावध पवित्रा घेतला आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : व्हिडीओकॉनच्या ३,२५0 कोटींच्या कर्ज घोटाळ्याच्या कारणामुळे आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरीत असली तरी या मुद्द्यावर मोदी सरकारने सावध पवित्रा घेतला आहे.बँकेने व्हिडीओकॉन समूहाला ३,२५0 कोटींचे कर्ज दिले असून, त्या बदल्यात व्हिडीओकॉनने कोचर यांचे पती दीपक यांच्या कंपनीस कोट्यवधी रुपये दिल्याचा तसेच दीर राजीव यांच्या कंपनीलाही आर्थिक लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे. यावरून चंदा कोचर यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या विषयावर घाईत निर्णय घेणार नसल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोचर यांचे पद तूर्त तरी सुरक्षित आहे. रिझर्व्ह बँकेनेही मौन बाळगले आहे.व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात खरेच काही देवाण-घेवाण झाली आहे का, याचा शोध आधी रिझर्व्ह बँकेने घ्यावा, अशी वित्त मंत्रालयाची भूमिका आहे. याच कारणांमुळे ‘गंभीर घोटाळा तपास संस्थे’ला या प्रकरणापासून दूर ठेवले आहे.>भाजपा नेत्यांचा विरोधकाही भाजपा खासदारांनी चंदा कोचर यांच्याविरुद्ध आवाज उठविला आहे. बँकेच्या बोर्डाने चंदा कोचर यांना दिलेल्या क्लीन चिटवर खा. किरीट सोमय्या यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खा. उदित राज यांनी सरकारला पत्र लिहून चंदा कोचर आणि बँकेविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :चंदा कोचर