नवी दिल्ली - अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न फाइल न केलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी केंद्र सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. इन्कम टॅक्स विभागाने याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती दिली आहे. गेल्यावर्षीपर्यंत विलंबाने आयकर परतावा भरणाऱ्यांकडून ठराविक दंड आकारण्यात येत होता. मात्र, गेल्यावर्षी नियमात बदल केला असून दंडाची रक्कम वाढवली आहे. पण, या दंडापासून वाचण्यासाठी सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत आयकर रिटर्न्स भरण्याची मुदत वाढवली आहे.
केंद्र सरकारने आयकर कायद्यात २३४ F या नव्या नियमाची भर घातली आहे. यानुसार, मुदतीनंतर आयकर परतावा भरणाऱ्या करदात्यांना १३९ (१) मधील तरतुदीनुसार दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. म्हणूनच आयकर परतावा मुदतीत भरणे आवश्यक आहे. त्यामुळे ही नवी संधी समजून 31 ऑगस्टपर्यंत आयकर रिटर्न्स भरणे फायद्याचे ठरेल.
Central Board of Direct Taxes (CBDT) extends the due date for filing of Income Tax Returns from 31st July to 31st August, 2019. pic.twitter.com/GUx3Tox9dP
— ANI (@ANI) July 23, 2019