Lokmat Money > बिझनेस न्यूज > PAN-Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख वाढवली, पण 'मोफत सेवा' आता संपली!

PAN-Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख वाढवली, पण 'मोफत सेवा' आता संपली!

PAN-Aadhaar Link : नोटिफिकेशनमध्ये असे म्हटले आहे की, करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 11:40 AM2022-03-31T11:40:40+5:302022-03-31T11:41:27+5:30

PAN-Aadhaar Link : नोटिफिकेशनमध्ये असे म्हटले आहे की, करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

cbdt income tax dept extended pan aadhaar link last date for one year but no more free service | PAN-Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख वाढवली, पण 'मोफत सेवा' आता संपली!

PAN-Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख वाढवली, पण 'मोफत सेवा' आता संपली!

नवी दिल्ली : जर तुम्ही अजून तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक (Pan Aadhaar link) केले नसेल. तर तुमच्यासाठी आनंदी होण्यासोबतच थोडे दु:खी होण्याचे कारण आहे. कारण, सरकारने या कामाची अंतिम तारीख एक वर्षासाठी वाढवली आहे, मात्र आता ही सेवा 'फुकट' मिळणार नाही.

आयकर विभागासाठी (Income Tax Department) धोरण बनवणारी सर्वोच्च संस्था केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. सीबीडीटीने बुधवारी संध्याकाळी उशिरा याबाबत अधिसूचना जारी केली.

नोटिफिकेशनमध्ये असे म्हटले आहे की, करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, सरकारने पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख चौथ्यांदा वाढवली आहे.

सीबीडीटीच्या या नवीन व्यवस्थेनंतर ज्यांचे पॅन-कार्ड आजपर्यंत आधारशी लिंक केलेले नाही, ते 31 मार्च 2023 पर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करत राहतील. अशा प्रकारे, आयकर रिटर्न भरण्यापासून ते परतावा मिळवण्यापर्यंत, ते पूर्वीप्रमाणेच वापरले जाऊ शकते.

आतापर्यंत या कामासाठी करदात्यांना कोणतेही पैसे द्यावे लागत नव्हते. मात्र आता ही 'मोफत सेवा' बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, जर करदात्याने 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 दरम्यान पॅन-आधार लिंक केले तर त्याला 500 रुपये आणि त्यानंतर 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.

Web Title: cbdt income tax dept extended pan aadhaar link last date for one year but no more free service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.