Join us

बँक घोटाळ्यात मारुती उद्योगाच्या माजी एमडीवर सीबीआयचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 3:23 AM

११० कोटींचा गैरव्यवहार; बेकायदेशीर कर्जे व आगाऊ रकमा दिल्या

नवी दिल्ली : ‘मारुती उद्योग’चे माजी व्यवस्थापकीय संचालक जगदीश खट्टर यांच्यावर सीबीआयने बँक कर्ज घोटाळा केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंदविला आहे. खट्टर यांच्या मालकीच्या ‘कार्नेशन आॅटो’ने ११0 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असून, या प्रकरणात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सूत्रांनी सांगितले की, याप्रकरणी अलीकडेच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्यात पंजाब नॅशनल बँकेला ११0 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. याप्रकरणी सीबीआयने सोमवारी कार्नेशन आॅटो इंडिया लिमिटेड कंपनीच्या ठिकाणांवर छापे मारले होते.सीबीआयने म्हटले की, बँकेकडे तारण असलेल्या मालमत्तांची खट्टर यांनी परस्पर विक्री केली. त्यातून मिळालेला निधीही त्यांनी परस्पर वळवला. हा फौजदारी स्वरूपाचा विश्वासघात आणि फसवणूक आहे. त्यातून बँकेला तोटा झाला आणि खट्टर यांना लाभ झाला.सीबीआयने म्हटले की, बँकेने १0 आॅक्टोबर रोजी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यात पाच आरोपींची नावे होती. कर्जाला तारण असलेल्या खट्टर आॅटो, कार्नेशन रिअल्टी आणि कार्नेशन इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनी या तीन कंपन्यांचा घोटाळ्यात थेट संबंध नसल्याचे पडताळणी प्रक्रियेत आढळून आले होते. पुढील चौकशीत त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकते.परवानगी न घेता विकली कंपनीच्बँकेने केलेल्या न्यायसहायक आॅडिटमध्ये असे आढळून आले की, बँकेकडे तारण असलेली ६६.९२ कोटी रुपयांची स्थिर मालमत्ता खट्टर यांनी बँकेची परवानगी न घेता ४.५५ कोटींत विकली.च्यातून आलेली रक्कम त्यांनी बँकेकडे जमाही केली नाही. खट्टर यांनी आपल्या कंपनीच्या सहयोगी कंपन्यांना अप्रामाणिकपणे आणि बेकायदेशीरपणे कर्जे आणि आगाऊ रकमा दिल्या.

टॅग्स :व्यवसायगुन्हेगारीबँक