नवी दिल्ली - आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडीओकॉन समूहाला देण्यात आलेल्या ३,२५० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात सीबीआयने या बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे दीर राजीव कोचर यांची सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी चौकशी केली. अधिका-यांनी सांगितले की, व्हिडीओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत आणि व्हिडीओकॉनशी त्यांचे संपर्क, कर्ज याबाबत राजीव कोचर यांच्याशी चर्चा केली. राजीव कोचर यांना गुरुवारी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यापूर्वी सीबीआयने त्यांच्याविरुद्ध लुक आउट नोटीस जारी केली होती.
राजीव कोचर यांची सीबीआय चौकशी
आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडीओकॉन समूहाला देण्यात आलेल्या ३,२५० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात सीबीआयने या बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे दीर राजीव कोचर यांची सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी चौकशी केली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:43 AM2018-04-07T00:43:10+5:302018-04-07T00:43:10+5:30