Lokmat Money > बिझनेस न्यूज > बिअरच्या किमतींमध्ये होतेय फिक्सिंग! गेल्या 11 वर्षांपासून मद्यपी जास्त दराने करतायेत खरेदी

बिअरच्या किमतींमध्ये होतेय फिक्सिंग! गेल्या 11 वर्षांपासून मद्यपी जास्त दराने करतायेत खरेदी

beer companies : सीसीआयच्या (The Competition commission of india) एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 08:52 PM2020-12-11T20:52:41+5:302020-12-11T21:01:58+5:30

beer companies : सीसीआयच्या (The Competition commission of india) एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. 

cci disclosure of beer companies cartelisation charge arbitrary prices for 11 years | बिअरच्या किमतींमध्ये होतेय फिक्सिंग! गेल्या 11 वर्षांपासून मद्यपी जास्त दराने करतायेत खरेदी

बिअरच्या किमतींमध्ये होतेय फिक्सिंग! गेल्या 11 वर्षांपासून मद्यपी जास्त दराने करतायेत खरेदी

Highlightsकंपन्यांना 25 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त दंड होऊ शकतो.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बिअर कंपन्या Carlsberg, SABMiller आणि भारतीय कंपनी United Breweries यांच्यामध्ये अंतर्गत वाटाघाटी करीत भारतात गेल्या 11 वर्षांपासून बिअर किंमतींमध्ये मनमानी कारभार केला जात असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. सीसीआयच्या (The Competition commission of india) एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. 

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बिअर कंपन्यांच्या टॉप अधिकाऱ्यांनी व्यवसायातील संवेदनशील माहिती शेअर केली आणि एकत्रितपणे 11 वर्षांपर्यंत देशातील बिअरच्या किमती फिक्स केल्या. रॉयटर्सने दावा केला आहे की, त्यांनी सीसीआयचा रिपोर्ट पाहिला आहे. मात्र अद्याप सीसीआयचा यावर कोणताही आदेश आलेला नाही. तसेच, सीसीआयचे वरिष्ठ अधिकारी याबाबत काय निर्णय घेणार, हे अद्याप समोर आले नाही.

रिपोर्टनुसार, 2007 ते 2018 दरम्यान हा मनमानी कारभार केला गेला आहे. सीसीआयच्या 248 पेजच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 'ब्रूअर्स यांनी एकत्रितपणे सरकारी मशिनरीचा दुरुपयोग केला आणि त्यांना ही बाब माहिती होती की त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये सीसीआयच्या कायद्याचं उल्लंघन केले जात होते.'

88 टक्के भागिदारी
सीसीआयने 2018 मध्ये या तीन बिअर कंपन्यांच्या ठिकाणांवर छापा टाकला होता आणि तपास सुरू केला होता. या तपासात या कंपन्यांवर  सवाल उपस्थित करण्यात आला होता. भारतातील सुमारे 52 हजार कोटींच्या बिअर मार्केटमध्ये त्यांची भागिदारी 88 टक्के आहे.

मोठा दंड आकारण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार हा रिपोर्टे मार्चमध्ये तयार करण्यात आला होता. आत्ता सीसीआयचे वरिष्ठ सदस्य यावर विचार करतील आणि कंपन्यांना 25 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त दंड होऊ शकतो.

अशी तयार केली रणनीती
या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये संभाषण, व्हॉट्सअप मेसेज आणि ई-मेल सीसीआयच्या रिपोर्टमध्ये सामील करण्यात आला आहे. यानुसार या कंपन्यांनी एकमेकांमध्ये तालमेल ठेवत अनेक राज्यात किंमती वाढविण्यासाठी रणनीती तयार केली आणि एकमेकांना मदत करुन किंमती ठरवल्या. त्यानंतर AIBA ने किंमती वाढविण्यासाठी या कंपन्यांकडून लॉबिंग केली.

Web Title: cci disclosure of beer companies cartelisation charge arbitrary prices for 11 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.