चंद्रकांत जाधव, जळगाव
देशात भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) पुढील महिन्यात ३४१ कापूस खरेदी केंद्र सुरू करणार आहे. पैकी ७० केंद्र राज्यात उघडले जातील, अशी माहिती सीसीआयचे महाव्यवस्थापक अतुल काला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महाकॉट संमेलनानिमित्त रविवारी ते येथे आले होते. ‘लोकमत’ शी बोलताना ते म्हणाले की, सीसीआयने राज्यात ७० केंद्र उघडण्यास मान्यता दिली आहे. नोडल संस्था म्हणून कापूस खरेदीसंबंधी पणन महासंघाची नियुक्ती करण्याचाही निर्णय झाला आहे. सध्या कापसाला खुल्या बाजारात आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव आहे. असे असले तरी सीसीआयची केंद्र सुरू करण्याची तयारी झाली आहे. येत्या महिन्यात हे केंद्र सुरू केले जातील. खान्देशात १८ केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
सीसीआयची ७० कापूस खरेदी केंद्रे येणार
देशात भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) पुढील महिन्यात ३४१ कापूस खरेदी केंद्र सुरू करणार आहे. पैकी ७० केंद्र राज्यात उघडले जातील
By admin | Published: October 25, 2015 10:34 PM2015-10-25T22:34:27+5:302015-10-25T22:34:27+5:30