Lokmat Money > बिझनेस न्यूज > Cement Price Hike: आता सिमेंटची बारी! पोत्यामागे ५५ रुपये दर वाढणार; घरांच्या किंमतीवरही परिणाम

Cement Price Hike: आता सिमेंटची बारी! पोत्यामागे ५५ रुपये दर वाढणार; घरांच्या किंमतीवरही परिणाम

पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली तरी देखील वस्तूंच्या वाढलेल्या किंमती काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. एकदा दर वाढले की ते चढेच राहतात, असा आजवरचा सामान्यांचा अनुभव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 11:04 AM2022-05-28T11:04:42+5:302022-05-28T11:05:02+5:30

पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली तरी देखील वस्तूंच्या वाढलेल्या किंमती काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. एकदा दर वाढले की ते चढेच राहतात, असा आजवरचा सामान्यांचा अनुभव आहे.

Cement Price Hike: Rs 55 per bag will be increased by ; Effects on house prices | Cement Price Hike: आता सिमेंटची बारी! पोत्यामागे ५५ रुपये दर वाढणार; घरांच्या किंमतीवरही परिणाम

Cement Price Hike: आता सिमेंटची बारी! पोत्यामागे ५५ रुपये दर वाढणार; घरांच्या किंमतीवरही परिणाम

पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने अन्न धान्यासह अन्य वस्तूंच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. जवळपास सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. असे असताना आता सिमेंटच्या दरामध्येही मोठी वाढ होणार आहे. यामुळे आपसुकच घरांच्या किंमतीदेखील वाढणार आहेत. कोरोमंडल किंग. संकर सिमेंट या नावाने इंडिया सिमेंट कंपनी भारतीय बाजारात आहे. 

इंडिया सिमेंटने दर पोत्यामागे ५५ रुपयांपर्यंत दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, ही दरवाढ एकाच वेळी केली जाणार नाही. एक जूनला सिमेंट पोत्याचा दर २० रुपयांनी वाढविला जाणार आहे. त्यानंतर १५ जूनला आणखी १५ रुपयांनी दर वाढ होईल आणि त्यानंतर १ जुलैला २० रुपयांनी दरवाढ केली जाणार आहे. 

यावर अन्य कंपन्या सिमेंटच्या दरात कपात करणार असल्याचा प्रश्न उपस्थित केला असता कंपनीचे उपाध्यक्ष आणि एमडी एन श्रीनिवासन यांनी माझी तुलना दुसऱ्यांशी करू नका, असे सांगितले. माझी नोकरी सिमेंट कंपनीच्या वरिष्ठ पदावर आहे. सर्व खर्च वाढला आहे, यामुळे मलाही आता काहीतरी पाऊल उचलावे लागणार आहे. असे न केल्यास कंपनीला मोठे नुकसान झेलावे लागेल, असेही ते म्हणाले. 

पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली तरी देखील वस्तूंच्या वाढलेल्या किंमती काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. एकदा दर वाढले की ते चढेच राहतात, असा आजवरचा सामान्यांचा अनुभव आहे. खाद्यपदार्थांच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत, त्या देखील भविष्यात कमी होण्याची शक्यता नाही. यामुळे इंधनाचे दर कमी झाले तरी नागरिकांना वाढलेल्या दरानेच वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत. 

Web Title: Cement Price Hike: Rs 55 per bag will be increased by ; Effects on house prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.