Join us

गुडन्यूज... बीएसएनएलला ४जी-५जीसाठी केंद्राची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:47 PM

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संकटात असलेल्या बीएसएनएलची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने १.६४ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. 

बीएसएनएलच्या सेवांमध्ये सुधारणा करणे, कंपनीचा आर्थिक ताळेबंद सुधारणे आणि कंपनीला फायबरच्या मदतीने नवे उड्डाण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे लक्ष्य या पॅकेजमागे आहे. याचसोबत सरकार बीएसएनएलला कर्ज फेडण्यासाठीही मदत करणार आहे. सध्या सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलवर ३३ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. बीएसएनएलला ४जी आणि ५जी सेवांसाठी स्पेक्ट्रम लिलावासाठीही मंजुरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :बीएसएनएलतंत्रज्ञानइंटरनेट