लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तोट्यात असलेल्या एअर इंडियाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रभावशाली योजना असून सरकारी मालकीची ही कंपनी जागतिक पातळीवर मोठी हवाई वाहतूक कंपनी बनेल, असे प्रतिपादन नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केले आहे.नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी अलिकडेच एअर इंडियाच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक पर्यायांचा विचार केला जात असल्याचे वक्तव्य केले होते. एअर इंडियात निर्गुंतवणूक केली जाऊ शकते, असे संकेतही त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर जयंत सिन्हा यांचे हे वक्तव्य आले आहे.एका मुलाखतीत सिन्हा जयंत यांनी सांगितले की, एअर इंडियाला प्रचंड उज्ज्वल भवितव्य आहे, असे मला वाटते. कारण भारताला ब्रिटिश एअरवेज, लुफ्तांसा, कंटास अथवा एमिरेट्स यांर्चंयाप्रमाणेच भारतासाठीही मोठ्या जागतिक विमान कंपनीची गरज आहे. एअर इंडियाच या पदापर्यंत पोहोचू शकते, याची आपणास खात्र िआहे. विशेष म्हणजे जयंत सिन्हा यांनी आपल्या वक्तव्यात नमूद केलेल्या विमान कंपन्यांपैकी संयुक्त अरब आमिरातीची एमिरेट्स ही कंपनी वगळता उरलेल्या सर्व कंपन्यांचे फार पूर्वीच खासगीकरण करण्यात आले आहे. ब्रिटिश एअरवेजचे १९८७ साली खासगीकरण करण्यात आले. आॅस्ट्रेलियाच्या कंटास या विमान कंपनीचे १९९५ मध्ये संपूर्ण खासगीकरण करण्यात आले. जर्मनीच्या लुफ्तांसाचे १९९७ साली संपूर्ण खासगीकरण करण्यात आले. मात्र एअर इंडियाच्या पुनरुज्जीवनाविषयी बोलताना जयतं सिन्हा यांनी खासगीकरणाचा उल्लेख केला नाही.
एअर इंडियाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राची योजना
By admin | Published: May 23, 2017 2:50 AM