Join us

केंद्र विकणार एमटीएनएलची मालमत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 4:56 AM

मुंबई, दिल्लीतील माहिती केली गोळा; लवकरच होणार लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सरकारी उपक्रमांची स्थिती सुधारण्यासाठीच्या व त्यानंतर खासगीकरणाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे पुढचे पाऊल म्हणून दूरसंचार क्षेत्रातील सरकारी उपक्रम असलेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेडची (एमटीएन) देशभरात असलेली मालमत्ता व जमिनी यांची माहिती केंद्र सरकारने गोळा केली आहे. त्यात मुंबईच्या बोरिवली येथील शिंपोली, मुलुंड, वसई या भागांतील एमटीएनएलच्या मालकीच्या जमिनींचाही समावेश आहे. एमटीएनएलच्या देशभरातील मालमत्ता व जमिनींचा काही महिन्यांत ऑनलाइन लिलाव करण्यात येईल.यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, दिल्लीमध्ये एमटीएनएलच्या मालकीची कार्यालये व दुकाने असलेल्या इमारती, नोएडा येथे निवासी संकुल असून त्यांचाही खासगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लिलाव करण्यात येईल.एमटीएनएलच्या मालमत्तेचा लिलाव करताना त्याच्या पायाभूत किमती काय ठरवाव्यात, वगैरे प्रक्रियेला आणखी दोन ते तीन महिने लागतील. त्यानंतर मालमत्तेच्या लिलावाला सुरुवात होणार आहे. सरकारी उपक्रमांची मालमत्ता विकण्यासाठी केंद्र सरकारने एमएसटीसी या सार्वजनिक कंपनीचे सहकार्य घेतले आहे. या प्रक्रियेची सूत्रे केंद्रीय निर्गुंतवणूक खात्याकडे आहेत.

बीएसएनएल, एमटीएनएल प्रचंड तोट्यातnभारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व एमटीएनएल या दोन कंपन्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना केंद्र सरकारने ६८ हजार कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. त्यासाठी पैसा उभारण्याकरिता या कंपन्यांच्या काही मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. nएमटीएनएलला दिल्ली व मुंबईत यंदाच्या आर्थिक वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ६४१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

टॅग्स :एमटीएनएलबीएसएनएल