Lokmat Money > बिझनेस न्यूज > केंद्र सरकारची घोषणा, 38 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार भरगोस दिवाळी बोनस

केंद्र सरकारची घोषणा, 38 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार भरगोस दिवाळी बोनस

केंद्र सरकारने आधी DA बाबत निर्णय घेतला, आता दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 02:48 PM2023-10-20T14:48:51+5:302023-10-20T14:49:05+5:30

केंद्र सरकारने आधी DA बाबत निर्णय घेतला, आता दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली.

Central government announced, 38 lakh employees will get huge Diwali bonus | केंद्र सरकारची घोषणा, 38 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार भरगोस दिवाळी बोनस

केंद्र सरकारची घोषणा, 38 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार भरगोस दिवाळी बोनस

Diwali Bonus For Central Employee: केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी दिवाळी भेट दिली आहे. अलीकडेच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला. 17 ऑक्टोबर 2023 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 30 दिवसांच्या मूळ वेतनाएवढी रक्कम मिळणार आहे. 

या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार 
दिवाळी बोनस हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा वार्षिक बोनस आहे. 2022-23 आर्थिक वर्षात किमान सहा महिने अखंड सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच दिवाळी बोनस मिळणार आहे. याशिवाय, इतर काही निकषात बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा दिवाळी बोनस दिला जाणार आहे. 

किती आणि कोणाला बोनस मिळेल?
बोनसची रक्कम कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या आधारावर निर्धारित केली जाते, कमाल मर्यादा रु. 7,000 आहे. गट-ब आणि गट-क श्रेणीतील सर्व अराजपत्रित कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जाणार आहे. याचा अर्थ अंदाजे 38 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाणार आहे. दिवाळी बोनसमध्ये केंद्रशासित प्रदेश प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Central government announced, 38 lakh employees will get huge Diwali bonus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.