Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता घर बसल्या मागवा डिझेल, केंद्राची 'ही' योजना सुरू  

आता घर बसल्या मागवा डिझेल, केंद्राची 'ही' योजना सुरू  

Fuel At Your Doorstep Scheme : ग्राहकांपर्यंत डिझेल पोहोचवण्यासाठी एक खास 'मोबाइल बाऊझर डिस्पेंसर' वाहन (मिनी टँकर) तयार करण्यात आला आहे.

By ravalnath.patil | Published: November 23, 2020 05:10 PM2020-11-23T17:10:26+5:302020-11-23T17:11:28+5:30

Fuel At Your Doorstep Scheme : ग्राहकांपर्यंत डिझेल पोहोचवण्यासाठी एक खास 'मोबाइल बाऊझर डिस्पेंसर' वाहन (मिनी टँकर) तयार करण्यात आला आहे.

Central Government Fuel At Your Doorstep Scheme Started In Punjab | आता घर बसल्या मागवा डिझेल, केंद्राची 'ही' योजना सुरू  

आता घर बसल्या मागवा डिझेल, केंद्राची 'ही' योजना सुरू  

Highlightsपठाणकोट येथील चामुंडा ऑटोफिल ही योजना राबविणारा पंजाबमधील पहिला पेट्रोल पंप ठरला आहे.

पठाणकोट : देशातील इंधन वाचविण्यासाठी आणि साठवलेल्या इंधनामुळे होणाऱ्या दुर्घटनांपासून वाचविण्यासाठी केंद्र सरकारने 'Fuel At Your Doorstep' योजना सुरू केली आहे. याअंतर्गत आता लोक आपल्या घरातून किंवा कार्यालयात मोबाईलवरून डिझेल मागवू शकतात. पठाणकोट येथील चामुंडा ऑटोफिल ही योजना राबविणारा पंजाबमधील पहिला पेट्रोल पंप ठरला आहे.

ग्राहकांपर्यंत डिझेल पोहोचवण्यासाठी एक खास 'मोबाइल बाऊझर डिस्पेंसर' वाहन (मिनी टँकर) तयार करण्यात आला आहे. याची क्षमता सहा हजार लिटर डिझेलची आहे. यामध्ये डिझेल घालण्याची मशीन सुद्धा आहे. चामुंडा ऑटोफिलचे मालक दिनेश गुप्ता यांनी सांगितले की, ही योजना पंजाब सरकारच्या कायदेशीर मेट्रोलॉजी विभागाने प्रमाणित केली आहे आणि टँकर पेट्रोलियम विस्फोटक सुरक्षा संघटनेद्वारे परवानाकृत आहे.

याचबरोबर, इंडियन ऑईलच्या 'मोबाइल बाउजर डिस्पेंसर'मुळे पंजाबमध्ये कोठेही डिझेलचा पुरवठा करता येईल. प्रमाणानुसार आकारण्याची तरतूद आहे. आत्तापर्यंत कोणाकडूनही कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले गेले नाही. दर बुधवारी धारीवाल ते गुरदासपूर आणि पठाणकोटपर्यंत पुरवठा केला जाईल, असे दिनेश गुप्ता म्हणाले. याशिवाय, इतर जिल्ह्यांनाही वेगवेगळ्या दिवशी पुरवठा केला जाईल. सध्या पेट्रोल पंपच्या 9646661600 या नंबरवर ऑर्डर घेतली जात आहे. येत्या काही दिवसांत इंडियन ऑईल अॅप आणि टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात येईल. त्यावर सुद्धा ऑर्डर बुक होतील.

यांना मिळणार फायदा!
इंडियन ऑईलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'मोबाइल बाउजर डिस्पेंसर' थेट डिझेल वाहनांमध्ये घातले जाणार नाही. शेतीची उपकरणे, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, मॉल, सिनेमा, प्री-मिक्स प्लॉट्स व कारखाने, मोबाइल टॉवर्सपर्यंत आवश्यकतेनुसार डिझेल पोहोचले जाईल. पंजाबमधील अनेक वितरकांनी यामध्ये रस दर्शविला आहे. काही महिन्यांनंतर अशी वाहने जवळपास प्रत्येक जिल्ह्यात धावतील आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय लोकांना घरबसल्या डिझेलचा पुरवठा करतील.

स्टोअर डिझेलमुळे होणाऱ्या दुर्घटना टळतील
इंडियन ऑईलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही लोक कॅनमध्ये डिझेल साठवतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय, बरीच अवजड वाहने आहेत, ज्यांना पेट्रोल पंपावर जाण्यासाठी 4-5 किलोमीटरमध्ये अनेक लीटर डिझेल वापरावे लागते. आता असे लोक त्यांच्या कार्यालयात किंवा संस्थेत डिझेल मागवू शकतील.
 

Web Title: Central Government Fuel At Your Doorstep Scheme Started In Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.