Join us

पेट्राेल, डिझेल विक्रीतून केंद्र सरकार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 8:25 AM

४ महिन्यांत कमावले १ लाख काेटी; महसुलात वाढ

ठळक मुद्देपेट्राेल आणि डिझेलवर केंद्र सरकार सध्या अनुक्रमे ३२.९८ आणि ३१.८० रुपये उत्पादन शुल्क आकारते. वर्षभरापूर्वी यात १९.८० रुपये वाढ करण्यात आली हाेती.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेलच्या विक्रमी दरांमुळे देशातील जनता ओरडत असली तरी सरकार मात्र मालामाल झाले आहे. पेट्राेलियम पदार्थांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पादन शुल्कातून केंद सरकारने चार महिन्यांमध्येच १ लाख काेटी रुपयांची भरघाेस कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये ४८ टक्के वाढ नाेंदविण्यात आली आहे. 

पेट्राेल आणि डिझेलवर केंद्र सरकार सध्या अनुक्रमे ३२.९८ आणि ३१.८० रुपये उत्पादन शुल्क आकारते. वर्षभरापूर्वी यात १९.८० रुपये वाढ करण्यात आली हाेती. यावर्षी कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे देशभरात पेट्राेलचे दरांनी शतक पार केले हाेते. तर काही राज्यांमध्ये डिझेलचे दरही १०० रुपयांवर पाेहाेचले हाेते. इंधनाच्या उच्चांकी दरांमुळे जनता ओरडत आहे. मात्र, सरकारने भरमसाठ कमाई केली आहे. आकडेवारीनुसार एप्रिल ते जुलै २०२१ या कालावधीत सरकारने १ लाख ३८७ काेटी रुपयांचा महसूल गाेळा केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६७ हजार ८९५ काेटी रुपये सरकारला मिळाले हाेते.  यामध्ये ४८ टक्के वाढ झाली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये सरकारला ३२ हजार ४९२ काेटी रुपयांचा अतिरिक्त महसूल झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, सरकारला ऑइल बाॅण्डवर यावर्षी १० हजार काेटी रुपयेच द्यायचे आहेत. यूपीए सरकारने १.३४ लाख काेटी रुपयांचे ऑइल बाॅण्ड जारी केले हाेते. ते पैसे १५ ते २० वर्षांमध्ये द्यायचे आहेत.

 

टॅग्स :पेट्रोलडिझेल