Join us

कामाची बातमी! आता गॅसशिवाय शिजणार अन्न; सरकार एवढ्या किमतीत देणार 'हा' खास स्टोव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:55 AM

देशात गेल्या काही दिवसापासून इंधनाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. एलपीजीमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे आता अन्न शिजवणेही महाग झाले आहे.

देशात गेल्या काही दिवसापासून इंधनाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. एलपीजीमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे आता अन्न शिजवणेही महाग झाले आहे. सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे  बजेट कोलमडले. मात्र एलपीजीच्या वाढत्या किमतीतून सुटका करण्यासाठी सरकारने सोलर स्टोव्ह आणला आहे. हा स्टोव्ह घरी आणून तुम्ही एलपीजीपासून मुक्त होऊ शकता. सरकारी मालकीच्या तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने हे बाजारात आणले आहे. या सोलर स्टोव्हचे नाव सूर्य नूतन असे आहे.

सूर्य नूतन स्टोव्ह सौर ऊर्जेवर चालतो. हा स्टोव्ह उन्हात ठेवण्याची गरज नाही. स्टोव्हचा वापर तुम्ही स्वयंपाकघरात किंवा तुमच्या सोयीनुसार कुठेही करू शकता. सूर्या नूतन सोलर स्टोव्हची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही एक रिचार्जेबल आणि इनडोअर सोलर कुकिंग सिस्टम आहे जी कायमस्वरूपी एकाच ठिकाणी ठेऊ शकता. हे इंडियन ऑइलच्या आर अँड डी सेंटर, फरीदाबाद यांनी डिझाइन केले आहे. इंडियन ऑईलने त्याचे पेटंटही घेतले आहे.

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जगाच्या तुलनेत भारतात वाढणार पगार, वाचा सविस्तर

आपल्याला किचनमध्ये ठेवून त्याचा वापर करता येतो. त्याचे एक युनिट सूर्यप्रकाशात राहते आणि चार्जिंग करताना ऑनलाइन कुकिंग मोड देते. याशिवाय चार्ज केल्यानंतरही वापरता येणार आहे. अशा प्रकारे 'सूर्य नूतन' सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करते.

सूर्या नूतन स्टोव्ह देखील हायब्रिड मोडवर काम करतो. म्हणजेच सौरऊर्जेशिवाय या स्टोव्हमध्ये विजेच्या इतर स्रोतही वापरता येतील. सूर्या नूतनचे इन्सुलेशन डिझाइन सूर्यप्रकाशापासून किरणोत्सर्ग आणि उष्णतेचे नुकसान कमी करते. सूर्या नूतन तीन वेगवेगळ्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. त्याचे प्रीमियम मॉडेल चार सदस्यांच्या कुटुंबासाठी पूर्ण जेवण बनवू शकते.

सूर्या नूतन स्टोव्हचे बेस मॉडेल घरी आणण्यासाठी तुम्हाला १२,००० रुपये खर्च करावे लागतील. तर टॉप मॉडेलची किंमत २३,००० रुपये आहे. 

टॅग्स :इंधन दरवाढमहागाईगॅस सिलेंडर