Join us

मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 12:14 PM

Minimum Wage Rate Increase : दिवाळीच्या आधीच केंद्र सरकारने एक निर्णय घेत देशभरातील मजूर, कामगारांना मोठं गिफ्ट दिले आहे. केंद्र सरकारने किमान वेतन दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Minimum Wage Rate Hike : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील मजूर, कामगारांच्या वेतनासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनेकामगारांनासाठी असलेला परिवर्तनीय महागाई भत्ता (variable dearness allowance) यामध्ये बदल केला आहे. मजुरांना दिल्या जाणाऱ्या किमान वेतन दरातही वाढ केली असून, तो प्रति दिन 1,035 रुपये करण्याची घोषणा केली आहे. किमान वेतन दर वाढवल्यामुळे कामगारांच्या हातात किती पैसे येतील, समजून घ्या... (minimum wage rate increase,Government Labour rate Per Day 2024)

अकुशल मजुरांना आता किती पैसे मिळणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अकुशल मजुरांच्या किमान वेतनामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला. पीटीआय वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रोजगार मंत्रालयाकडून याबद्दलची माहिती दिली गेली आहे. मजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. 

किमान वेतन दरांमध्ये बदल करण्यात आल्यानंतर,स्वच्छता कामगार, हमाल म्हणून काम करणाऱ्या अकुशल क्षेत्रातील अ श्रेणीतील किमान वेतन दर ७८३ रुपये प्रति दिन असेल. त्यामुळे या मजुरांना महिन्याला २०,३५८ रुपये इतका पगार मिळेल.

'या' मजुरांना महिन्याला मिळेल २६००० पेक्षा जास्त पगार

सरकारकडून मजुरांच्या वेगवेगळी वर्गवारी करण्यात आलेली आहे. त्या श्रेणीनुसार किमान वेतन दर निश्चित केलेला आहे. त्यात आता वाढ करण्यात आली असून, अर्ध कुशल मजुरांसाठी किमान वेतन दर प्रति दिन ८६८ रुपये इतका करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना दर महिन्याला २२,५६८ रुपये मिळतील. 

कुशल कामगारांबद्दल म्हणजे लिपिक किंवा विना शस्त्र सुरक्षा रक्षक, गार्ड यांचा किमान वेतन दर प्रति दिन ९५४ रुपये केला आहे. त्यामुळे त्यांना महिन्याला २४,८०४ रुपये मिळतील. उच्च कुशल कामगारांचा किमान वेतन दर प्रति १,०३५ रुपये करण्यात आला असून, त्यांना महिन्याला २६,९१० रुपये मिळतील. 

नवीन किमान वेतन दर कधीपासून लागू होणार?

मजूर, कामगारांच्या वेतन दरात वाढ करण्यात आल्यानंतर श्रम मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, पुढच्या महिन्यापासून म्हणजे १ ऑक्टोबर २०२४ पासून नवीन किमान वेतन दर लागू होईल. या कामगारांना एप्रिल २०२४ पासूनची थकीत रक्कमही दिली जाईल. 

टॅग्स :केंद्र सरकारकामगारपैसापंतप्रधान