पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या किंमतीत सरकार सामान्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. काही दिवसात सरकार काही वस्तुंवरील टॅक्स कमी करु शकते. महागाई कमी करण्यासाठी आरबीआयच्या शिफारशीनुसार सरकार हा निर्णय घेऊ शकते. केंद्र सरकार इंधनावरील कर कमी करु शकते.
फेब्रुवारी महिन्यातील महागाईचे आकडे समोर आल्यानंतरच हा निर्णय घेतला जाऊ शकतो. भारताचा वार्षिक किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारी २०२३ मध्ये ६.५२ टक्के झाला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये तो ५.७२ टक्के होता.
Post Office ची जबरदस्त सेविंग स्कीम, फक्त ५ वर्षात मिळतं ३ लाखांचं एक्स्ट्रा इन्कम!
येणाऱ्या काही दिवसात खाण्याचे पदार्थांचे दर वाढू शकतात. दूध, मक्का, सोयाबीन तेलांच्या किमती वाढू शकतात. “सरकार मक्यासारख्या उत्पादनांवर आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. त्यावर ६० टक्के मूलभूत शुल्क आहे. यावर अर्थ मंत्रालय आणि आरबीआयने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, सरकार इंधनावरील करात घट करु शकते. क्रुड ऑइलच्या किंमती गेल्या काही महिन्यांपासून कमी झाल्या आहेत. काही दिवसापासून इंधनाच्या किंमती स्थीर आहेत. बुधवारी दुपारी ब्रेंट ऑइल फ्युचर्स ८४.३२ डॉलर प्रति बॅरलवर घसरत होते.
भारत आपल्या गरजेच्या दोन तृतीयांश तेलाची आयात करतो. केंद्र सरकारने जर कर कपात केली तर पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात.