Lokmat Money > बिझनेस न्यूज > केंद्र सरकार IRCTC मधील 20 टक्के भागिदारी विकणार, प्रति शेअरची इतकी असेल Floor Price

केंद्र सरकार IRCTC मधील 20 टक्के भागिदारी विकणार, प्रति शेअरची इतकी असेल Floor Price

IRCTC : आयआरसीटीसीमध्ये सरकारचे 3.2 कोटी शेअर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 02:20 PM2020-12-10T14:20:23+5:302020-12-10T14:21:12+5:30

IRCTC : आयआरसीटीसीमध्ये सरकारचे 3.2 कोटी शेअर आहेत.

central government to sell 20 percent stake in irctc floor price set at 1367 rupees per share  | केंद्र सरकार IRCTC मधील 20 टक्के भागिदारी विकणार, प्रति शेअरची इतकी असेल Floor Price

केंद्र सरकार IRCTC मधील 20 टक्के भागिदारी विकणार, प्रति शेअरची इतकी असेल Floor Price

Highlightsआयआरसीटीसी ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी (पीएसयू) आहे, जी रेल्वे मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आयआरसीटीसी (IRCTC)मधील 20 टक्के हिस्सा (Government Stake) विकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सरकार ऑफर ऑफ सेलद्वारे (OFS) कंपनीमधील आपले 2.4 कोटी शेअर्सची विक्री करेल. इतकेच नाही तर जास्त सबस्क्रिप्शन झाल्यास सरकारने 80 लाख अतिरिक्त शेअर्सची विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

आयआरसीटीसीमध्ये सरकारचे 3.2 कोटी शेअर आहेत. आयआरसीटीसीच्या शेअर्सची विक्री 10 आणि 11 डिसेंबर 2020 ला स्टॉक एक्सचेंजच्या स्वतंत्र विंडोद्वारे केली जाईल, असे केंद्राने म्हटले आहे. 

किरकोळ गुंतवणूकदार 11 डिसेंबरला शेअर्ससाठी अर्ज करू शकतील
11 डिसेंबरला फक्त किरकोळ गुंतवणूकदारांनाच (Retail Investors) शेअर्ससाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे केंद्राने म्हटले आहे. सरकारने त्याची फ्लोर किंमत (Floor Price) 1367 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. केंद्राने निश्चित केलेली फ्लोर किंमत आयआरसीटीसीच्या बुधवारी बंद झालेल्या किंमतीपेक्षा 16 टक्के कमी आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांना 16 टक्के सवलतीच्या किंमतीसह गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. दरम्यान, बुधवारी कंपनीचे शेअर्स 1618.05 रुपयांच्या किंमतीवर बंद झाले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये कंपनीचे शेअर 52 आठवड्यात वाढून 1995 रुपयापर्यंत पोहोचले होते. यानंतर मार्चमध्ये घसरून 74.85 प्रति शेअर रुपयांवर पोहोचले होते.

निव्वळ नफा आणि कमाई यात मोठी घट
आयआरसीटीसीचा निव्वळ नफा 30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान 67.3 टक्क्यांनी घसरून 32.63 कोटी रुपये झाला होता. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 99.82 कोटी होता. तसेच, सप्टेंबर 2020 च्या तिमाहीमध्ये आयआरसीटीसीच्या आपरेशन्समुळे महसूलमध्ये (Revenue from Operations) 83 टक्के घट झाली आणि ती 88 कोटी रुपये झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला आपरेशन्समुळे 533 कोटी रुपयांची कमाई झाली होती. दरम्यान, आयआरसीटीसी ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी (पीएसयू) आहे, जी रेल्वे मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे. ही कंपनी कॅटरिंग सर्व्हिसच्या व्यतिरिक्त ऑनलाइन रेल्वेची तिकिटे आणि बाटली बंद पाणी  (Packaged Water) देखील पुरवते.

आयआरसीटीसीची तेजस एक्स्प्रेस लवकरच ट्रॅकवर धावणार 
भारतीय रेल्वेने गेल्या महिन्यात आयआरसीटीसीद्वारे चालविण्यात येणारी खासगी ट्रेन स्थगित केली आहे. ही ट्रेन लखनऊ ते दिल्ली आणि अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावते. दरम्यान, आयआरसीटीसीने 17 ऑक्टोबरपासून तेजस एक्स्प्रेसचे परिचालन सुरू केले. मात्र, कोरोनाव्हायरसमुळे स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता तेजस एक्स्प्रेस लवकरच पुन्हा रुळावर येईल, अशी अपेक्षा आहे.
 

Web Title: central government to sell 20 percent stake in irctc floor price set at 1367 rupees per share 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.