नवी दिल्ली : EPF interest rates : केंद्र सरकार (Central Government) देशातील सहा कोटी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आज मोठा निर्णय घेणार आहे. केंद्र सरकारकडून पीएफवरील व्याज दर आज जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे व्याज दर कमी होणार की वाढविण्यात येतील, हे बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेल्या कर्मचार्यांना समजणार आहे. (central government will declare epf interest rates for 2020 21 today)
ईपीएफओची सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) बैठक आज, 4 मार्च 2021 रोजी श्रीनगर येथे होणार आहे. 2020-21 आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दरांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा ईपीएफओच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
2020-21 या आर्थिक वर्षासाठी सरकार पीएफ व्याजदरात कपात करू शकेल, असे मानले जात आहे. दरम्यान, 2019-20 साठीचे व्याज दर 8.5 टक्के होते. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. त्यामुळे यावेळी सरकार व्याजदरात कपात करू शकते.
2012-13 नंतर व्याज दर खालच्या स्तरावर2019-20 साठी पीएफवर मिळणारा व्याज दर 2012-13 नंतरचा सर्वात खालच्या स्तरावरील आहे. 2018-19 मध्ये ईपीएफओने ग्राहकांना 8.65 टक्के व्याज दिले.
दरवर्षी होते व्याज दरांची घोषणाकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना प्रत्येक वित्तीय वर्षासाठी पीएफच्या रकमेवर व्याज दर जाहीर करते. आर्थिक वर्ष 2019-20 च्या व्याजदराची घोषणा करताना मंडळाने म्हटले होते की, 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात दोन हप्त्यांमध्ये 8.5 टक्के व्याज दिले जाईल. पहिल्या हप्त्यात 8.15 टक्के डेट इन्वेस्टमेंट (Debt Instrument) आणि दुसऱ्या हप्त्यात 0.35 टक्के व्याज इक्विटीकडून (Equity) दिले जाईल.
आतापर्यंतचे पीएफवरीव व्याज दर...>> 2019-20 - 8.5 टक्के>> 2018-19 - 8.65 टक्के>> 2017-18 - 8.55 टक्के>> 2016-17 - 8.65 टक्के>> 2015-16 - 8.8 टक्के>> 2013-14 - 8.75 टक्के