Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO Interest: केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना भेट?; ६ कोटी PF खातेधारकांना मोठा फायदा

EPFO Interest: केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना भेट?; ६ कोटी PF खातेधारकांना मोठा फायदा

सध्या पीएफवर मिळणारं व्याजदर हे गेल्या अनेक दशकांच्या तुलनेत कमी आहे. EPFO नं २०२१-२२ या काळात व्याजदर ८.१ टक्के निश्चित केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 08:39 AM2022-05-11T08:39:44+5:302022-05-11T08:40:21+5:30

सध्या पीएफवर मिळणारं व्याजदर हे गेल्या अनेक दशकांच्या तुलनेत कमी आहे. EPFO नं २०२१-२२ या काळात व्याजदर ८.१ टक्के निश्चित केले आहे.

Central Government will give EPFO Interest to employees ?; Big benefit to 6 crore PF account holders | EPFO Interest: केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना भेट?; ६ कोटी PF खातेधारकांना मोठा फायदा

EPFO Interest: केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना भेट?; ६ कोटी PF खातेधारकांना मोठा फायदा

नवी दिल्ली – खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ईपीएफओकडून भेट मिळण्याची शक्यता आहे. पीएफवर मिळणारं व्याज कमी असल्यानं डिसेंबरपूर्वी ही रक्कम क्रेडिट केली जाईल. आता केवळ अर्थ मंत्रालयाकडून यावर शिक्कामोर्तब होणं गरजेचे आहे. कारण आता पीएफवर ४३ वर्षात पहिल्यांदा इतकं कमी व्याज मिळत आहे. त्यामुळे अर्थ मंत्रालय याला मंजुरी देण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ईपीएफओ सदस्यांच्या PF खात्यावर व्याज क्रेडिट केले जाऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकार पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत पीएफ खातेधारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे ट्रान्सफर करू शकतं. मात्र काही वृत्तानुसार, दसरा-दिवाळीच्या सणानिमित्त हे व्याज दिले जाऊ शकते. परंतु अद्याप यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. सरकारनेही घोषणा केली नाही. सामान्यत: वर्षाच्या अखेरीस पीएफचं व्याज दिले जाते. परंतु यावेळी व्याज कमी असल्याने ईपीएफओ डिसेंबरपर्यंत वाट पाहणार नाही असं म्हटलं जात आहे. यामुळे ईपीएफओच्या साडे सहा कोटी खातेधारकांना फायदा मिळणार आहे.

सध्या पीएफवर मिळणारं व्याजदर हे गेल्या अनेक दशकांच्या तुलनेत कमी आहे. EPFO नं २०२१-२२ या काळात व्याजदर ८.१ टक्के निश्चित केले आहे. १९७७-७८ नंतर पहिल्यांदाच इतकं कमी व्याजदर दिले जात आहे. याआधी ८.५ टक्के व्याजदर मिळत होते. मागील वर्षी २०२०-२१ मध्ये पीएफ व्याजदरात कुठेही बदल केला नाही. त्याआधी २०१९-२० मध्ये व्याजदर ८.६५ टक्के मिळत होते त्यात घट करून ८.५० टक्के इतके केले. ईपीएफओ पीएफ खातेधारकांच्या खात्यावर जमा पैसे अनेक ठिकाणी गुंतवणूक केली जाते. या गुंतवणुकीतील कमाईचा भाग व्याजाच्या रुपाने खातेधारकांना दिला जातो. आता ईपीएफओ ८५ टक्के भाग गुंतवणूक करतो. त्यात सरकारी सिक्युरिटीज आणि बॉन्डचाही समावेश आहे. बाकी १५ टक्के भाग ईटीएफवर लावला जातो. डेट आणि इक्विटीच्या कमाईच्या आधारे पीएफ व्याजदर निश्चित केले जाते.

‘अशा’प्रकारे पीएफ खात्यावरील शिल्लक जाणून घ्या

EPFO वेबसाईटवर जाऊन Our Service ऑप्शनवर जात For Employees वर क्लिक करा. त्यानंतर मेंबर पासबूकवर क्लिक करावं. आता याठिकाणी यूएएन नंबर आणि पासवर्डच्या मदतीनं लॉग इन करा. पीएफ खाते सिलेक्ट करून तुम्ही शिल्लक रक्कम जाणून घेऊ शकता. SMS च्या माध्यमातून शिल्लक जाणून घेण्यासाठी ७७३८२९९८९९ या नंबरवर EPFOHO UAN ENG टाइप करून मेसेज पाठवा. त्यानंतर आपल्याला रिप्लाय मेसेजमध्ये बॅलेन्सची माहिती मिळेल. त्याशिवाय उमंग अँपच्या माध्यमातून शिल्लक रक्कम जाणून घेता येईल.

Web Title: Central Government will give EPFO Interest to employees ?; Big benefit to 6 crore PF account holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.