Join us

केंद्र सरकार २६ सरकारी कंपन्यांची भागीदारी विकणार; २३ कंपन्यांच्या खाजगीकरणाला कॅबिनेटची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 10:02 PM

केंद्र सरकारने २३ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे

ठळक मुद्दे२७ जुलै २०२० रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. 

नवी दिल्ली : आधीच आर्थिक मंदीने झगडत असलेली भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटात फारच डळमळीत झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतत सरकारी उपक्रमांत (PSUs) आपली भागीदारी विकण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्यानुसार २७ जुलै २०२० रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. 

केंद्र सरकारने २३ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला मंत्रिमंडळाकडून ग्रीन सिग्नलही मिळाला आहे, असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खाजगीकरण करण्यात येणाऱ्या २३ सरकारी कंपन्या कोणत्या आहेत, याबाबत काहीच सांगितले नव्हते. मात्र, सरकार आपली भागीदारी २३ नव्हे तर २६ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील विकत असल्याचे माहिती अधिकाराखालील (आरटीआय) विचारणेत उघड झाले आहे. 

या आरटीआय अर्जात या कंपन्यांची नावेही विचारण्यात आली होती. त्यानुसार सर्व २६ कंपन्यांच्या नावांसह, विकल्या गेलेल्या भागीदारीची टक्केवारी बाजारपेठेनुसार निश्चित केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय, आरटीआयमध्ये युको बँकेच्या खाजगीकरणाच्या यादीत समावेश करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत केंद्र सरकारने सर्व सेक्टर्स खाजगी क्षेत्रासाठी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, विविध क्षेत्रांच्या खाजगीकरणाच्या धोरणाबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असे गेल्या काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते. 

आरटीआयमधून मिळालेली २६ कंपन्यांची यादी पुढील प्रमाणे....1. Project & Development India Limited (PDIL)2. Engineering Projects India Limited (EPIL)3. Pawan Hans Limited (PHL)4. B&R Company Limited (B&R)5. Air India6. Central Electronics Limited(CEL)7. Cement Corporation India Limited CCIL (Nayagaon unit)8. Indian Medicine & Pharmaceuticals Corporation Ltd. (IMPCL)9. Salem Steel Plant, Bhadrawati Steel Plant, Durgapur Steel plant10.Ferro Scrap Nigam Ltd. (FSNL)11.Nagarnar Steel Plant of NDMC12.Bharat Earth Movers Limited (BEML)13.HLL Lifecare14.Bharat Petroleum Corporation Ltd. (BPCL)15.Shipping Corporation of India Ltd. (SCI)16.Container Corporation of India Ltd (CONCOR)17.Nilachal Ispat Nigam Limited (NINL).18.Hindustan Prefab Limited (HPL)19.Bharat Pumps and Compressors Ltd (BCPL)20.Scooters India Ltd (SIL)21.Hindustan Newsprint Ltd (HNL)22.Karnataka Antibiotics & Pharmaceuticals Ltd (KAPL)23.Bengal Chemicals and Pharmaceuticals Ltd. (BCPL)24.Hindustan Antibiotics Ltd. (HAL)25.Indian Tourism Development Corporation (ITDC)26.Hindustan Fluorocarbon Ltd (HFL) 

आणखी बातम्या...

"माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा!"    

- दाऊदचा हस्तक बोलतोय, उद्धव ठाकरेंशी बोलायचंय; 'मातोश्री'वर दुबईहून फोन    

- दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर    

- सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप    

राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना    

- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स    

- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला     

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

टॅग्स :निर्मला सीतारामनकोरोना वायरस बातम्याअर्थव्यवस्था