Lokmat Money > बिझनेस न्यूज > निवृत्त कर्मचा-यांसाठी केंद्र सरकारचे अ‍ॅप, सारी माहिती लगेच मिळणार, तक्रारी नोंदवता येणार

निवृत्त कर्मचा-यांसाठी केंद्र सरकारचे अ‍ॅप, सारी माहिती लगेच मिळणार, तक्रारी नोंदवता येणार

निवृत्त सरकारी कर्मचा-यांच्या साह्यासाठी केंद्र सरकारने एक अ‍ॅप विकसित केले असून, त्याचे उद्घाटन बुधवारी होणार आहे. या अ‍ॅपचा वापर करून आपल्या निवृत्तिवेतन प्रकरणांवर कर्मचा-यांना लक्ष ठेवता येईल. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:40 AM2017-09-20T01:40:00+5:302017-09-20T01:40:02+5:30

निवृत्त सरकारी कर्मचा-यांच्या साह्यासाठी केंद्र सरकारने एक अ‍ॅप विकसित केले असून, त्याचे उद्घाटन बुधवारी होणार आहे. या अ‍ॅपचा वापर करून आपल्या निवृत्तिवेतन प्रकरणांवर कर्मचा-यांना लक्ष ठेवता येईल. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

The Central Government's app for retired employees, all information will be received immediately, complaints can be lodged | निवृत्त कर्मचा-यांसाठी केंद्र सरकारचे अ‍ॅप, सारी माहिती लगेच मिळणार, तक्रारी नोंदवता येणार

निवृत्त कर्मचा-यांसाठी केंद्र सरकारचे अ‍ॅप, सारी माहिती लगेच मिळणार, तक्रारी नोंदवता येणार

नवी दिल्ली : निवृत्त सरकारी कर्मचा-यांच्या साह्यासाठी केंद्र सरकारने एक अ‍ॅप विकसित केले असून, त्याचे उद्घाटन बुधवारी होणार आहे. या अ‍ॅपचा वापर करून आपल्या निवृत्तिवेतन प्रकरणांवर कर्मचा-यांना लक्ष ठेवता येईल. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. निवृत्त कर्मचा-यांसाठी हे अ‍ॅप अनेकार्थांनी उपयोगी सिद्ध होणार आहे. निवृत्ती निधीचा आढावा घेणे आणि काही तक्रार असल्यास ती नोंदविणे ही कामे अ‍ॅपद्वारे करता येतील.
या कामांसाठी मंत्रालयाने निवृत्तिवेतनधारकांचे एक पोर्टल याआधीच सुरू केले आहे. या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा अ‍ॅपच्या माध्यमातून आता मोबाइलवरही उपलब्ध होतील. हे अ‍ॅप निवृत्त होणारे कर्मचारी आणि निवृत्त झालेले कर्मचारी अशा दोघांसाठीही उपयुक्त आहे. निवृत्त होणारे कर्मचारी निवृत्तिवेतन मंजुरी प्रक्रियेची प्रगती अ‍ॅपवर पाहू शकतील. निवृत्त कर्मचारी आपल्या निवृत्तिवेतनाच्या रकमेचा आढावा घेऊ शकतील, निवृत्तिवेतनाची रक्कम तपासू शकतील. त्यासाठी खास पेन्शन कॅलक्युलेटर अ‍ॅपवर आहे. अ‍ॅपवर तक्रारी नोंदविण्याबरोबरच त्यांचा पाठपुरावा करता येईल, तसेच विभागाने जारी केलेल्या आदेशांची माहिती घेता येईल. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते अ‍ॅपचे उद्घाटन होणार आहे.
>अनुभव मंचसाठी काम करणा-यांना पुरस्कार
‘अनुभव’ मंचासाठी अद्वितीय कामगिरी करणा-या निवृत्त कर्मचा-यांना जितेंद्र सिंग यांच्या हस्ते पुरस्कारही देण्यात येणार आहेत. अनुभव हा मंच निवृत्त सरकारी कर्मचाºयांसाठी आपल्या कामाचा अनुभव सामायिक करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या ३00 केंद्रीय कर्मचाºयांसाठी निवृत्तीपूर्व समुपदेशन कार्यशाळेचे आयोजनही यानिमित्ताने करण्यात आले आहे. निवृत्तीनंतरच्या जबाबदा-यांबाबत जाणीव जागृती करणे, तसेच निवृत्तीनंतरच्या जीवनात कर्मचाºयांना मदत करणे हा या कार्यशाळेमागील हेतू आहे, असे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: The Central Government's app for retired employees, all information will be received immediately, complaints can be lodged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.