मोदी सरकारने निवडणूक वर्षातील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली. यात एक कोटी लोकांना मोफत वीज देण्याची घोषणा केली. १ कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनेल बसवून ही योजना सुरू होईल. त्यानंतर प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत ३०० युनिट मोफत देण्यात येणार आहेत. ही योजना प्रत्येक वापरकर्त्याला १८,००० रुपयांपर्यंत बचत करण्यास मदत करेल.
तज्ज्ञांच्या मते, छतावर सौरऊर्जेद्वारे मोफत वीज देण्याचा सरकारचा निर्णय हा सरकारचा दुहेरी विजय मानला जात आहे. पहिल्यांदा, सरकार या योजनेद्वारे पर्यावरणावरील नकारात्मक परिणाम कमी करेल. दुसरा फायदा म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशाला दिलासा मिळणार आहे. ही योजना तुमचे १८,००० रुपये वाचणार आहेत.
संरक्षणावर पूर्ण भर; कृषी, शेतकरी कल्याणला सर्वात कमी बजेट! अर्थसंकल्पातून कुणाला काय मिळालं?
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे उद्दिष्ट सोलर पॅनेलद्वारे घरांमध्ये वीज पुरवठा करणे आहे. याशिवाय अतिरिक्त वीजनिर्मितीसाठीही अतिरिक्त निधी द्यावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी ही घोषणा केली होती. मोठ्या संख्येने निवासी वापरकर्त्यांना रूफटॉप सोलर एनर्जी सिस्टीम बसविण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक मोठी राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याची विनंतीही पंतप्रधानांनी केली होती.
सूर्यवंशी भगवान श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पीएम मोदींनी लगेच बैठक घेतली. १ कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्यासंदर्भात ही बैठक झाली. यामध्ये प्रधानमंत्री सूर्योदय योजनेवर चर्चा करण्यात आली.
योजनेसाठी कोण पात्र ?
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून १ कोटी कुटुंबांना छतावर सौरऊर्जेचा लाभ दिला जाईल. ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांचे वीज बिल कमी करण्यासाठी मदत करण्यासाठी आहे.
सोलर सिस्टमचे फायदे काय?
वीजबिलात ग्राहकांची बचत.
रिकाम्या छताच्या जागेचा वापर, अतिरिक्त जमिनीची गरज नाही.
अतिरिक्त ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन लाईन्सची आवश्यकता नाही.
विजेचा वापर आणि उत्पादन यांच्यातील संतुलनामुळे, T&D तोटा कमी होतो.
टेल-एंड ग्रिड व्होल्टेजमध्ये सुधारणा आणि सिस्टमच्या गर्दीत घट.
प्रदूषण कमी करून दीर्घकालीन ऊर्जा आणि पर्यावरणीय सुरक्षा.
Discoms/Utility द्वारे दिवसाच्या पीक लोडचे उत्तम व्यवस्थापन.
१८,००० रुपयांची बचत होणार
आता ३०० युनिट मोफत विजेमुळे सर्वसामान्यांची बचत कशी होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हे उदाहरण म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रति युनिट विजेची सरासरी किंमत सुमारे ५ रुपये आहे. एका महिन्यात ३०० युनिट वीज मोफत उपलब्ध असेल, तर त्याची किंमत सुमारे १५०० रुपये आहे. जर १२ महिन्यांचा हिशोब केला तर संपूर्ण वर्षासाठी ३६०० युनिट्सची किंमत १८,००० रुपये होईल. एका महिन्यात ३०० युनिट आणि वर्षभरात ३६०० युनिट मोफत वीज मिळाल्याने लोकांचे १८००० रुपये वाचतील.