Join us  

आजपासून सुरू झाली केंद्र सरकारची अनोखी योजना; दरमहा या लोकांना मिळणार 10,000 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 6:11 PM

Modi Government Scheme: सरकारने एक खास योजना लॉन्च केली आहे. याद्वारे तुम्ही लाखो-करोडो रुपये जिंकू शकता.

Mera Bill Mera Adhikar Scheme: केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांसाठी एक अनोखी योजना आणली आहे. या योजनेत तुम्हाला कोट्यवधी रुपये जिंकण्याची संधी आहे. "मेरा बिल, मेरा अधिकार' असे या योजनेचे नाव आहे. आजच सरकारने ही योजना 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू केली आहे. सध्या चालू आर्थिक वर्षात शासनाने बक्षीस रकमेसाठी 30 कोटी रुपयांचा निधी तयार केला आहे.

50 हजारांहून अधिक लोकांनी अॅप डाउनलोड केलेहरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आतापर्यंत 50,000 हून अधिक लोकांनी या योजनेचे अॅप डाउनलोड केले आहे. 

लकी ड्रॉ काढला जाईलमहसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, 'माय बिल, माय राइट' जीएसटी लकी ड्रॉ सहा राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात येत असून केंद्र आणि राज्ये बक्षीस रकमेत समान योगदान देतील.

या राज्यांमध्ये योजना सुरू झाल्याचालू आर्थिक वर्षात दरमहा सरासरी जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपये आहे. सरकारने शुक्रवारी 'माय बिल, माय राइट' योजना प्रायोगिक तत्त्वावर 1 सप्टेंबरपासून आसाम, गुजरात आणि हरियाणा आणि पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू केली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला 810 लकी ड्रॉ होतील. प्रत्येक तिमाहीत दोन बंपर लकी ड्रॉ होतील.

800 लोकांना 10,000 रुपये मिळतीलग्राहक त्यांची GST बिले अॅपद्वारे अपलोड करून योजनेत सामील होऊ शकतात. लकी ड्रॉद्वारे बक्षिस जाहिर केले जाईल. मासिक सोडतीमध्ये 800 जणांना 10,000 रुपयांचे बक्षीस आणि 10 जणांना 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. विशेष म्हणजे प्रत्येक तिमाहीत 1 कोटी रुपयांचा बंपर ड्रॉदेखील असेल. 

टॅग्स :केंद्र सरकारसरकारी योजनाजीएसटीइन्कम टॅक्स