Join us

Hudco: गुंतवणुकीची संधी! मोदी सरकारची ‘या’ कंपनीतील हिस्सा विक्री प्रक्रिया सुरु; ऑफर केवळ २ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 3:17 PM

Hudco: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या अनेकविध कंपन्यांमधील हिस्सेदारी विकून, निधी जमा करणार असल्याची घोषणा केली होती.

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या अनेकविध कंपन्यांमधील हिस्सेदारी विकून, निधी जमा करणार असल्याची घोषणा केली होती. मोदी सरकारने एका कंपनीतील हिस्सा विकण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या कंपनीतील शेअर खरेदी करण्याची केवळ दोन दिवसांची ऑफर देण्यात आली आहे. (central govt may garners rs 720 crore from Hudco OFS)

केंद्र सरकारकडून हुडकोमधील हिस्सा विक्री केली जाणार आहे. हुडको ऑफर फॉर सेल सुरु झाली असून यासाठी प्रती शेअर ४५ रुपये भाव निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत एकूण १६ कोटी १ लाख शेअर विक्री केले जाणार असून त्यातून ७२० कोटी उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आहे. या हिस्सा विक्रीला संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिला असन, एनएसईवर हुडकोचा इश्यू १.२७ पटीने सबस्क्राइब झाल्याचे सांगितले जात आहे.

याला म्हणतात रिटर्न! TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीची कमाल; गुंतवणूकदारांचे केले १ लाखाचे ८७ लाख 

अतिरिक्त अनुदान ठेवण्याचा पर्याय

हुडको ऑफर फॉर सेलमध्ये केंद्र सरकार ११.०१ कोटी शेअर विक्री करणार आहे. यात २.५ टक्के किंवा ५ कोटी शेअरहुन अधिक अतिरिक्त अनुदान ठेवण्याचा पर्याय आहे. ऑफर फॉर सेलसाठी प्रती शेअर ४५ रुपये भाव निश्चित करण्यात आला असून, ऑफरच्या तुलनेत ४.६६ टक्के कमी आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी हुडकोची हिस्सा विक्री खुली झाली असून, बुधवारपासून किरकोळ गुंतवणूकदारांना ही ऑफर खुली होईल, असे केंद्रीय सचिव तुहीन कांत पांडे यांनी सांगितले. सरकारने ९.९० कोटी शेअर संस्थात्मक गुंतवणूकदारांना विक्री केले असून, यातून ७ हजार ६४६ कोटी उभारले आहेत. तर, ३६५१ कोटी एनएमडीसी आणि ३९९४ कोटी एसयूयूटीआयने शेअर विक्री केले आहेत. 

TATA ग्रुपमध्ये पार्टनर होण्याची उत्तम संधी! केवळ १० हजार गुंतवा आणि मोठी कमाई करा

दरम्यान, तेजीने वधारलेल्या शेअरची विक्री करून नफेखोरांनी कमाई केल्याची सेन्सेक्स आणि निफ्टीला मोठी झळ बसली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा जीडीपी कमी केल्याने बाजार सुरु होताच नफावसुलीचा सपाटा दिसून आला. जगभरातील प्रमुख शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे. शेअर बाजारात एंट्री घेतल्यापासून सुस्साट पळणाऱ्या झोमॅटोच्या तेजीला आज ब्रेक बसला आहे. 

टॅग्स :व्यवसायशेअर बाजारकेंद्र सरकार