Join us

Aadhaar Card New Guidelines : आधार कार्ड दर 10 व्या वर्षी अपडेट करावे लागेल, सरकारकडून अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 2:33 PM

Aadhaar Card New Guidelines : दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड घेतलेल्या लोकांसाठी आवश्यक बदल करण्यात आले आहेत. 

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे 10 वर्षांपूर्वी बनवलेले आधार कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड घेतलेल्या लोकांसाठी आवश्यक बदल करण्यात आले आहेत. 

आधार कार्डमध्ये काही चूक असेल आणि कोणतीही कागदपत्रे देऊन अपडेट केले नसेल तर आता ते अपडेट करणे आवश्यक करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे व्यक्तीचा डेटा योग्य करणे आहे. सध्या काहीच लोक आपल्या आधार कार्डमध्ये बदल करत आहेत. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या मुद्द्यांवर कारवाई करण्यात मदत होईल. तसेच, डेटा अपडेट केल्यास इतर योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.

दरम्यान, आधारची व्याप्ती वाढवण्यासाठी आता तयारी सुरू झाली आहे. यासाठी आधारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयने राज्यांना सरकारी कामात आधारची व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे, जेणेकरून सरकारी पैशांचा अपव्यय थांबवता येईल. 

काय करावे लागेल?कार्ड अपडेट करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल. तसेच, फोटो आयडी घेऊन जावे लागेल. फॉर्ममध्ये घरचा पत्ता सविस्तर भरणे आवश्यक आहे. फोटो आयडीमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा असू शकते. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही शुल्क सुद्धा आकारले जाईल.

मुलांसाठी बाल आधार5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बाल आधार तयार केले जाते. यामध्ये त्यांचा फोटो असतो, तसंच आई-वडिल किंवा पालकांचे बायमेट्रिक डिटेल्स असतात. जेव्हा मुल 5 वर्षांचं होतं तेव्हा त्या मुलाचे बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट केले जातात. अशातच नाव आणि पत्ताही अपडेट केला जातो.

टॅग्स :आधार कार्डव्यवसाय