Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकारला लॉटरी! ३ महिन्यात ३,३९,२२५ कोटींचा कर महसूल जमा; ४५ टक्क्यांची प्रचंड वाढ

मोदी सरकारला लॉटरी! ३ महिन्यात ३,३९,२२५ कोटींचा कर महसूल जमा; ४५ टक्क्यांची प्रचंड वाढ

कर महसुलातील प्रचंड वाढीने अर्थव्यवस्था कोरोना संकटातून पूर्णपणे सावरली असल्याचे अधोरेखित झाल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 11:18 PM2022-06-19T23:18:15+5:302022-06-19T23:19:57+5:30

कर महसुलातील प्रचंड वाढीने अर्थव्यवस्था कोरोना संकटातून पूर्णपणे सावरली असल्याचे अधोरेखित झाल्याचे सांगितले जात आहे.

centre modi govt direct tax revenue raised by 45 percent in first quarter of current financial year | मोदी सरकारला लॉटरी! ३ महिन्यात ३,३९,२२५ कोटींचा कर महसूल जमा; ४५ टक्क्यांची प्रचंड वाढ

मोदी सरकारला लॉटरी! ३ महिन्यात ३,३९,२२५ कोटींचा कर महसूल जमा; ४५ टक्क्यांची प्रचंड वाढ

नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. मात्र, देशातील सर्वच क्षेत्रे आता पूर्वपदावर आल्याचे दिसत आहे. कारण GST सह चालु आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत केंद्र सरकारलाकर महसुलाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. कर महसुलातील प्रचंड वाढीने अर्थव्यवस्था कोरोना संकटातून पूर्णपणे सावरली असल्याचे अधोरेखित झाल्याचे सांगितले जात आहे. 

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात तब्बल ४५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. केंद्राला पहिल्या तीन महिन्यात ३,३९,२२५ कोटींचा कर महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या याच कालावधीत सरकारला २,३३,६५१ कोटी रुपयांचा कर महसूल मिळाला होता. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निव्वळ संकलन वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत १७१ टक्क्यांहून अधिक आहे. २०१९-२० मधील याच कालावधीच्या तुलनेत यंदाचे कर संकलन १०३ टक्क्यांहून अधिक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

एसटीटीसह वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश

पहिल्या तिमाहीत सरकारला प्राप्त झालेल्या ३,३९,२२५ कोटी रुपयांच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनामध्ये १,७०,५८३ कोटी रुपये कॉर्पोरेशन कर (सीआयटी) आणि १,६७,९६० कोटी रुपये (निव्वळ परतावा) एसटीटीसह वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश आहे. एकूण कर संकलनात कंपनी कर (सीआयटी) १,९०,६५१ कोटी आणि एसटीटीसह (STT) वैयक्तिक प्राप्तीकर (PIT) १,७८,२१५ कोटी रुपये समाविष्ट आहे. किरकोळ शीर्षक निहाय संकलनामध्ये १,०१,०१७ कोटी रुपये आगाऊ कर संकलन, टीडीएस २,२९,६७६ कोटी रुपये, २१,८४९ कोटी रुपये स्व-मूल्यांकन कर, नियमित मूल्यांकन कर १०,७७३ कोटी रुपये , वितरित नफ्यावर कर ५,५२९ कोटी रुपये आणि ७१५ कोटी रुपये इतर किरकोळ शीर्षकाखालील कर समाविष्ट आहे.

दरम्यान, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पहिल्या तिमाहीत आगाऊ कर संकलन १,०१,०१७ कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ३३ टक्क्यांहून अधिक वृद्धी झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ७५,७८३ कोटी रुपये आगाऊ कर संकलन झाले होते. यंदा १६ जून २०२२ पर्यंत टीडीएस संकलन २,२९,६७६ कोटी इतके वाढले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ४६ टक्क्यांहून अधिक वृद्धी झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत १,५७,४३४ कोटी रुपये टीडीएस प्राप्त झाला होता. याच कर संकलनात स्वयं-मूल्यांकन कर संकलन २१,८४९ कोटी रुपये असून असून मागील वर्षाच्या याच कालावधीतील १५,४८३ कोटी रुपये स्व-मूल्यांकन कर संकलनाच्या तुलनेत ४१ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३०,३३४ कोटी रुपये परतावा स्वरूपात जारी करण्यात आले आहेत.
 

Web Title: centre modi govt direct tax revenue raised by 45 percent in first quarter of current financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.