Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता प्राप्तीकर आणि GST भरताना कोणतीही अडचण येणार नाही, Infosys च्या सीईओंची माहिती

आता प्राप्तीकर आणि GST भरताना कोणतीही अडचण येणार नाही, Infosys च्या सीईओंची माहिती

आयटीआर फाईल करताना अनेकांना येत होत्या अडचणी पण आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 02:07 PM2022-08-16T14:07:15+5:302022-08-16T14:14:16+5:30

आयटीआर फाईल करताना अनेकांना येत होत्या अडचणी पण आता...

CEO of Infosys salil parekh no problem in paying tax on income tax portal and gstn portal | आता प्राप्तीकर आणि GST भरताना कोणतीही अडचण येणार नाही, Infosys च्या सीईओंची माहिती

आता प्राप्तीकर आणि GST भरताना कोणतीही अडचण येणार नाही, Infosys च्या सीईओंची माहिती

पुणे: सध्या प्राप्तिकर रिटर्न पोर्टल (income tax portal) आणि जीएसटी नेटवर्क पोर्टल (gst network portal) अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी सांगितले. इन्फोसिसने ही दोन्ही पोर्टल्स तयार केली आहेत. ही कंपनी या दोन पोर्टलसाठी तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा कंपनी देखील आहे. २०२१ पासून ही नवीन सेवा इन्फोसिसने सुरू केली होती.

पारेख यावेळी बोलताना म्हणाले, सध्या जीएसटीचे मोठा भरणा झाला आहे. त्याचबरोबर ३१ जुलैच्या निर्धारित कालावधीत ५.८ कोटी आयकर रिटर्न भरल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, हे दोन्ही पोर्टल सरकारच्या डिजिटल कार्यक्रमाचा मोठा सकारात्मक प्रभाव दाखवत आहेत. लोकांनी यावेळी ITR सहजतेने भरले आहे. यापूर्वी नागरिकांना आयटीआर फायलिंग करताना येणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. येणाऱ्या इन्कम टॅक्स रिटर्न फाइलिंग आणि जीएसटीएन पोर्टलबद्दल विचारले असता पारेख म्हणाले, "हे पोर्टल सध्या चांगले काम करत आहेत."

भारतीयांना इन्कम टॅक्स रिटर्न फाइलिंग करण्यासाठी हे पोर्टल गेल्या वर्षी 7 जूनला सुरू करण्यात आले होते. 'हे पोर्टल लॉन्च झाल्यानंतर वापरकर्त्यांना काही काळ तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला, सध्या या त्रुटी दूर झाल्या आहेत का, असेही पारेख यावेळी म्हणाले.

Web Title: CEO of Infosys salil parekh no problem in paying tax on income tax portal and gstn portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.