Join us

"कामाचं प्रमाण नाही तर, गुणवत्ता..," ९० तासांच्या वादात आता अदर पूनावालांची उडी, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 09:46 IST

Adar Poonawala Serum Institute : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी कामाच्या तासांवरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे.

Adar Poonawala Serum Institute : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी कामाच्या तासांवरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. कामाच्या प्रमाणापेक्षा गुणवत्ता महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं. पूनावाला यांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली. "आनंद महिंद्रा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझ्या बायकोलाही वाटतं की मी एक अप्रतिम व्यक्ती आहे आणि तिलाही रविवारी माझ्याकडे पाहत बसायला आवडतं," असं ते म्हणाले.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

"कामाच्या प्रमाणापेक्षा त्याची गुणवत्ता अधिक महत्त्वाची आहे," असंही पूनावाला पुढे म्हणाले. शनिवारी महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ही चर्चा चुकीच्या दिशेने जात असल्याचं म्हटलं. नारायण मूर्ती आणि इतर कॉर्पोरेट व्यक्तींबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. माझा मुद्दा असा आहे की आपण कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, कामाच्या प्रमाणावर नाही. याशिवाय एल अँड टीचे चेअरमन एस. एम. सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर टोला लगावताना माझी पत्नी खूप सुंदर आहे आणि मला तिच्याकडे पाहायला आवडतं, असंही ते म्हणाले होते.

एल अँड टी अध्यक्षांचा व्हिडीओ व्हायरल

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यानंतर सर्वप्रथम कामाच्या तासांबाबत चर्चा सुरू झाली. आठवड्याला ७० तास काम करण्याची त्यांची बाजू होती. नुकतेच एल अँड टीचे चेअरमन एस. एम. सुब्रमण्यन यांचं आठवड्यातून ९० तास काम करण्याचं वक्तव्य व्हायरल झालं होते. तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ पाहू शकता? बायको किती वेळ नवऱ्याकडे बघू शकते? त्यामुळे ऑफिसमध्ये येऊन काम करा, असं ते म्हणाले होते.

सुब्रमण्यन यांच्या वक्तव्याचा बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पदुकोण, आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका आणि माजी भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांनी निषेध केला आहे.

टॅग्स :अदर पूनावालाआनंद महिंद्रा