Join us

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 11:34 AM

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी देखील देबरॉय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले. मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. देबरॉय यांची देशाची आर्थिक नीती ठरविण्याबाबत मोठी भूमिका होती. 

मोदी यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. मी डॉ. देबरॉय यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. मला त्यांचे अंतर्दृष्टी आणि शैक्षणिक चर्चेची आवड नेहमी लक्षात राहील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना, असे मोदी यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी देखील देबरॉय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. देबरॉय हे एक सैद्धांतिक आणि अनुभवी अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंवर काम केले आहे. सामान्य लोक जटिल आर्थिक समस्या सहजपणे समजू शकतील असे विशेष कौशल्य त्यांच्याकडे होते, असे रमेश म्हटले आहेत.  

टॅग्स :नरेंद्र मोदीअर्थव्यवस्था