Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वांना खूश करण्याचे अर्थमंत्र्यांपुढे आव्हान; सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प

सर्वांना खूश करण्याचे अर्थमंत्र्यांपुढे आव्हान; सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प

आर्थिक सर्वेक्षणात विदेश व्यापार तोटा जीडीपीच्या २.६ टक्के म्हणजे ४.९४ लाख कोटी असल्याचे नमूद आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 06:01 AM2019-07-05T06:01:58+5:302019-07-05T06:05:02+5:30

आर्थिक सर्वेक्षणात विदेश व्यापार तोटा जीडीपीच्या २.६ टक्के म्हणजे ४.९४ लाख कोटी असल्याचे नमूद आहे.

Challenge against the Finance Minister Sitaraman budget to be presented today | सर्वांना खूश करण्याचे अर्थमंत्र्यांपुढे आव्हान; सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प

सर्वांना खूश करण्याचे अर्थमंत्र्यांपुढे आव्हान; सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प

- सोपान पांढरीपांडे

नागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सादर केलेल्या २०१८-१९ च्या आर्थिक सर्वेक्षणातून त्यांच्यापुढे किती मोठे आव्हान उभे आहे त्याची स्पष्ट कल्पना येते. सर्वेक्षणात जागतिक अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत आहे, चीन-अमेरिका व्यापार युद्धामुळे मंदी वाढण्याची शक्यता असताना भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढही ७.२ टक्क्यावरून ६.८० टक्क्यांवर आली आहे, हे मान्य केले आहे.

मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी सकल राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी १९० लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज बांधला आहे व त्याच्या ३.४ टक्के वित्तीय तूट असल्याचे नमूद आहे. ही तूट ६.४६ लाख कोटी आहे. महसुली तूट २.३ टक्के म्हणजे ४.३७ लाख कोटी आहे. वित्तीय तूट ६.४६ लाख कोटीवरून कमी करणे, हे सीतारामन यांच्यापुढील पहिले आव्हान आहे.

आर्थिक सर्वेक्षणात विदेश व्यापार तोटा जीडीपीच्या २.६ टक्के म्हणजे ४.९४ लाख कोटी असल्याचे नमूद आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी असताना निर्यात वाढवून विदेश व्यापार तोटा कमी करणे हे सीतारामन यांच्यापुढील दुसरे मोठे आव्हान आहे. विदेश व्यापार तोटा परकीय चलनाच्या गंगाजलीपेक्षा (तब्बल २८.९१ लाख रुपये) खूपच कमी आहे, ही समाधानाची बाब आहे. हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी १ फेबु्रवारी २0१९ ला सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प २७ लाख कोटींचा होता. सीतारामन यांचा अर्थसंकल्प ३० ते ३२ लाख कोटी (महसूल व खर्चाचा) राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Challenge against the Finance Minister Sitaraman budget to be presented today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.