नवी दिल्ली : फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्या याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालकीच्या कंपन्यांच्या मालमत्ता जप्त करण्याविरोधात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने मल्ल्या यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. मल्ल्या याच्या वतीने एफ. एस. नरिमन यांनी बाजू मांडली. मालमत्ता जप्तीला आव्हान देणारी मल्ल्या याची एक याचिका याआधीच न्यायालयात प्रलंबित आहे.
आधीच्या या याचिकेसोबत नव्या याचिकेची सुनावणी घेण्याची विनंती अॅड. नरिमन यांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य
केली आहे. मालमत्ता जप्तीसंबंधीच्या कायद्याच्या वैधतेलाही मल्ल्या याच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.
प्रत्यार्पणाचा खटला सुरू
च्ही याचिका न्यायालयाने २ आॅगस्ट रोजी सुनावणीस ठेवली आहे. मल्ल्या हा सध्या ब्रिटनमध्ये असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्यावर भारतीय बँकांना ९ हजार कोटी रुपयांना फसविल्याचा आरोप ठेवलेला आहे. ब्रिटनमध्ये त्यांच्या विरोधात प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे.