Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाई भत्त्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान

महागाई भत्त्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान

त्रिपुरा उच्च न्यायालयाने कर्मचारी व सेवानिवृत्तांना ३१ टक्के महागाई भत्ता देण्याच्या दिलेल्या आदेशाला त्रिपुरा सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.

By admin | Published: July 21, 2016 12:02 AM2016-07-21T00:02:08+5:302016-07-21T00:02:08+5:30

त्रिपुरा उच्च न्यायालयाने कर्मचारी व सेवानिवृत्तांना ३१ टक्के महागाई भत्ता देण्याच्या दिलेल्या आदेशाला त्रिपुरा सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.

Challenge in the Supreme Court to the Order of Dearness Allowance | महागाई भत्त्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान

महागाई भत्त्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान


आगरतळा : त्रिपुरा उच्च न्यायालयाने कर्मचारी व सेवानिवृत्तांना ३१ टक्के महागाई भत्ता देण्याच्या दिलेल्या आदेशाला त्रिपुरा सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
राज्य सरकार प्रचंड आर्थिक अडचणींना तोंड देत आहे त्यामुळेच उच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला, असे अर्थमंत्री भानु लाल साहा यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले. त्रिपुरा सरकारी कर्मचारी महासंघाने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना ३१ टक्के महागाई भत्ता देण्याचा आदेश दिला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Challenge in the Supreme Court to the Order of Dearness Allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.