मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ व व्यवस्थापकीय संचालक चंद कोचर यांना बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी सक्तीच्या रजेवर पाठविले. व्हिडीओकॉन समूहाला कर्ज देताना अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी चंदा कोचर यांची बँकेच्या अंतर्गत समितीमार्फत चौकशी होणार आहे.
कोचर यांचे दीर राजीव कोचर यांचीही सीबीआयने या प्रकरणी चौकशी केली आहे. यामुळे निवृत्त न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्याकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी सायंकाळी झाली. त्यामध्ये अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत कोचर यांना रजेवर पाठविण्याचा निर्णय बँकेने घेतला.
चंदा कोचर यांच्या जागी आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्सचे संदीप बक्षी हे सीओओ म्हणून काम पाहतील. बँकेचे कार्यकारी संचालक एन. एस. कन्नन यांच्याकडे आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्सची धुरा सोपविण्यात आली आहे.
चंदा कोचर सक्तीच्या रजेवर
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ व व्यवस्थापकीय संचालक चंद कोचर यांना बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी सक्तीच्या रजेवर पाठविले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:28 AM2018-06-19T06:28:48+5:302018-06-19T06:28:48+5:30