Lokmat Money > बिझनेस न्यूज > चंदा कोचर अडचणीत?, निर्दोषत्व देणाऱ्या संचालकांमध्ये दुफळी

चंदा कोचर अडचणीत?, निर्दोषत्व देणाऱ्या संचालकांमध्ये दुफळी

व्हिडीओकॉन प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना दोन आठवड्यांपूर्वी निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणा-या आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळात आता मात्र त्यांना पायउतार व्हा, असे सांगायचे की नाही यावर मतभेद आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:45 AM2018-04-10T00:45:01+5:302018-04-10T00:45:01+5:30

व्हिडीओकॉन प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना दोन आठवड्यांपूर्वी निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणा-या आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळात आता मात्र त्यांना पायउतार व्हा, असे सांगायचे की नाही यावर मतभेद आहेत.

Chanda Kochar Troubleshooter, Unfinished Drivers | चंदा कोचर अडचणीत?, निर्दोषत्व देणाऱ्या संचालकांमध्ये दुफळी

चंदा कोचर अडचणीत?, निर्दोषत्व देणाऱ्या संचालकांमध्ये दुफळी

नवी दिल्ली : व्हिडीओकॉन प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना दोन आठवड्यांपूर्वी निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणा-या आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळात आता मात्र त्यांना पायउतार व्हा, असे सांगायचे की नाही यावर मतभेद आहेत.
व्हिडीओकॉन ग्रुपला कर्ज देताना कोचर यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याच्या आरोपांची सरकारी यंत्रणा चौकशी करीत आहे. कोचर यांनी त्याच पदावर राहण्यास किमान काही बाहेरच्या संचालकांनी विरोध केलेला आहे, असे नाव न छापण्याच्या अटींवर अधिकाºयांनी सांगितले.
भारतात खासगी क्षेत्रात दुसºया क्रमांकावर असलेल्या या बँकेचे संचालक मंडळ १२ जणांचे असून त्याची आठवड्यात पुढील निर्णयासाठी बैठक होणार आहे. कोचर यांचा सध्याच्या पदाचा कालावधी ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे. संचालक मंडळाने बँकेची पत मंजुरीची प्रक्रिया तपासून पाहिल्यावर ती बळकट असल्याचे त्यांना २८ मार्चच्या नोंदींवरून आढळले. या नोंदींवरून मंडळाचे अध्यक्ष एम.के. शर्मा यांनी कोणत्याही प्रकारचा लाभ देणे-घेणे, नातेवाइकांचे हित साधणे किंवा हितसंबंध एकमेकांना आडवे येण्याचा प्रश्नच नाही, असे सांगून कोचर यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला होता.
मंडळावर बँकेचे अध्यक्ष तसेच आयुर्विमा महामंडळाचे प्रमुख यांच्यासह सहा स्वतंत्र संचालक आहेत. आयुर्विमा महामंडळाचा या बँकेत ९.४ टक्के वाटा आहे, असे ब्लूमबर्गने गोळा केलेल्या माहितीत म्हटले आहे. मंडळात सरकारचा प्रतिनिधी व आयसीआयसीआयचे पाच संचालक आहेत. केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) व्हिडीओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत व चंदा
कोचर यांचे पती दीपक यांच्यातील कथित संबंधांची प्राथमिक चौकशी नुकतीच सुरू केली आहे. जे काही चुकीचे घडले असे आरोप आहेत त्यांचे मूल्यमापन करण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे प्राथमिक चौकशी आहे.
>माहिती पूर्ण चुकीची असल्याचा दावा
‘चंदा कोचर यांनी दूर
व्हावे, असे काही
संचालकांना वाटत असल्याची तुमची माहिती ही पूर्णपणे निराधार आणि चुकीची आहे, असे आयसीआयसीआयच्या प्रवक्त्याने ई-मेलने पाठवलेल्या उत्तरात
म्हटले आहे.
संचालक मंडळातील काही सदस्यांना कोचर यांनी पायउतार व्हावे, असे वाटते का, असे या प्रवक्त्याला ई-मेलने विचारले होते.
आयसीआयसीआयचे शेअर्स सोमवारी सकाळी १०.५४ वाजता जवळजवळ एक टक्क्याने खाली आले होते.

Web Title: Chanda Kochar Troubleshooter, Unfinished Drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.