मुंबई : टाटा सन्सचे नवे चेअरमन एन. चंद्रशेखरन हे मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत. सायरस मिस्त्री यांची चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रतन टाटा यांच्याकडे हे पद होते.
५४ वर्षीय चंद्रशेखरन हे चंद्रा या लघुनावाने औद्योगिक वर्तुळात ओळखले जातात. १५0 वर्षे जुन्या टाटा समूहाचे ते पहिले बिगर पारसी चेअरमन ठरणार आहेत. टाटांची उपकंपनी टीसीएस प्रमुखपद त्यांच्याकडे होते. टीसीएसचा सध्या जो काही नावलौकिक आहे, त्यामागे चंद्रा यांचीच कर्तबगारी आहे. चंद्रा यांच्या कार्यकाळात टाटा सन्सची कामगिरी कशी राहील, याकडे आता उद्योगविश्वाचे लक्ष लागले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
चंद्रशेखरन आज स्वीकारणार टाटा सन्सचा कार्यभार
टाटा सन्सचे नवे चेअरमन एन. चंद्रशेखरन हे मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत. सायरस मिस्त्री यांची चेअरमनपदावरून हकालपट्टी
By admin | Published: February 21, 2017 12:17 AM2017-02-21T00:17:04+5:302017-02-21T00:17:04+5:30