Join us

चंद्रयान-3 वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या 'इंग्रजांना' आनंद महिंद्रांचे चोख प्रत्युत्तर, पाहा काय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 1:33 PM

भारताला गरिब म्हणून हिणवणाऱ्या ब्रिटिश वाहिनीला महिंद्रांनी करुन दिली 'ब्रिटिश' राजवटीची आठवण.

Chandrayaan-3: 23 ऑगस्ट, हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे. भारताचा महत्वकांशी प्रकल्प, चंद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरला. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जगभरातून भारताचे कौतुक होत आहे, पण ब्रिटनच्या सरकारी वाहिनीने चंद्रयान-3 वर प्रश्न उपस्थित केले. यानंतर, भारतातील दिग्गज उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (anand mahindra) यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्या वाहिनीला सडेतोड उत्तर दिले. 

काय म्हणाला ब्रिटिश अँकर?सोशल मीडियावर त्या वाहिनीच्या अँकरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो म्हणतो की, 'भारतात पायाभूत सुविधांचा अभाव आहे, भारतात अत्यंत गरिबी आहे. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या दारिद्र्यात जगते, देशातील 700 मिलियनहून अधिक लोकांकडे शौचालये देखील नाहीत. अशा परिस्थितीत चंद्रयान-3 सारख्या महागड्या प्रकल्पावर इतके पैसे खर्च का करावे?' 

महिंद्रांनी दिले सडेतोड उत्तर या व्हिडिओला रिट्विट करत महिंद्रांनी म्हटले की, 'खरंच?? आमच्या देशात असलेली गरिबी, तुम्ही लादलेल्या अनेक दशकांच्या वसाहतवादी राजवटीचा परिणाम होती. या राजवटीने संपूर्ण उपखंडातील संपत्ती पद्धतशीरपणे लुटली. आमच्याकडून लुटलेली सर्वात मौल्यवान संपत्ती कोहिनूर हिरा नसून आमचा अभिमान आणि आमच्या क्षमतेवर असलेला विश्वास होता.'

ते पुढे म्हणाले, 'वसाहतीकरणाचे उद्दिष्ट - त्याचा सर्वात घातक परिणाम - पीडितांना त्यांच्या दारिद्र्याबद्दल पटवून देणे आहे. हेच कारण आहे की टॉयलेट आणि स्पेस एक्सप्लोरेशन, या दोन्हीमध्ये गुंतवणूक करणे हा विरोधाभास नाही. चंद्रावर जाण्याने आम्हाला आमचा अभिमान आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. यामुळे विज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रगतीवर आमचा विश्वास वाढतो. यामुळे आम्हाला गरिबीतून बाहेर येण्याची प्रेरणा मिळते.' 

टॅग्स :चंद्रयान-3आनंद महिंद्राआंतरराष्ट्रीयभारतइस्रो