Lokmat Money > बिझनेस न्यूज > चंद्रयान-3 ने बदलले 'या' कंपनीचे नशीब, काही दिवसात 40,195 कोटींची कमाई

चंद्रयान-3 ने बदलले 'या' कंपनीचे नशीब, काही दिवसात 40,195 कोटींची कमाई

Chandrayaan 3: गुंतवणूकदारांनीही केली लाखोंची कमाई.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 01:45 PM2023-09-11T13:45:38+5:302023-09-11T13:46:25+5:30

Chandrayaan 3: गुंतवणूकदारांनीही केली लाखोंची कमाई.

Chandrayaan 3: Chandrayaan-3 changed L&T company's fortunes, earning Rs 40,195 crore in a few days | चंद्रयान-3 ने बदलले 'या' कंपनीचे नशीब, काही दिवसात 40,195 कोटींची कमाई

चंद्रयान-3 ने बदलले 'या' कंपनीचे नशीब, काही दिवसात 40,195 कोटींची कमाई

Chandrayaan 3: काही दिवसांपूर्वीच भारताची महत्वकांशी चंद्र मोहीम चंद्रयान-3 यशस्वी झाली. या मोहिमेच्या यशानंतर, या मोहिमेत योगदान देणाऱ्या सर्व कंपन्यांना नवीन ऑर्डर मिळत आहेत. यामुळए कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. यात सर्वाधिक फायदा लार्सन टुब्रोमध्ये (L&T) कंपनीला झाला आहे. 

कंपनीला बंपर फायदा
चंद्रयान 23 ऑगस्ट रोजी यशस्वीरित्या चंद्रावर उतरले, पण त्याच्या तीन दिवस आधीपासूनच कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. 18 ऑगस्टपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅपमध्ये 40 हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. आता कंपनीचे एकूण मार्केट कॅप 4 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. 

25 दिवसांत कंपनीचे शेअर्स 286 रुपयांनी वाढले
लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये 25 दिवसांत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 18 ऑगस्ट रोजी कंपनीचा शेअर 2,639.90 रुपयांवर होता, जो आज 2926 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 25 दिवसांत 286 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. चंद्रयानाच्या यशानंतर कंपनीचे शेअर्स ही वाढ झाली आहे. अशातच बातम्या येत आहेत की, जगातील सर्वात मोठी तेल कंपनी सौदी अरामकोने कंपनीला 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांना फायदा 
कंपनीच्या शेअर्समधून गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळाला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने 18 ऑगस्ट रोजी रु. 2,639.90 प्रमाणे कंपनीचे 1000 शेअर्स खरेदी केले असते, तर त्याच्या 26,39,900 रुपयांच्या गुंतवणूकीचे आज 29,26,000 रुपये झाले असते. याचा अर्थ त्या गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे मूल्य 2,86,000 रुपयांपेक्षा जास्त वाढले असते. हा गुंतवणूकदारासाठी मोठा नफा आहे. तज्ञांच्या मते कंपनीचे शेअर्स येत्या काही दिवसांत 3,000 रुपयांची पातळी ओलांडू शकतात. यामुळे गुंतवणूकदारांना आणखी फायदा होऊ शकतो.

डिस्क्लेमर: आम्ही तुम्हाला कंपनीच्या शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देत आहोत, कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Web Title: Chandrayaan 3: Chandrayaan-3 changed L&T company's fortunes, earning Rs 40,195 crore in a few days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.