आज केवळ भारतातच नाही तर जगभरात चंद्रयान ३ ची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी रशियाची चंद्र मोहीम अयशस्वी झाली. आता सर्वांच्या नजरा चांद्रयान ३ वर लागल्या आहेत आणि संपूर्ण जग या मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करत आहे. याच्या यशासोबत इस्रो सोबत योगदान दिलेल्या कंपन्यांचं यशही जोडलं गेलेलं आहे. आज चंद्रयान ३ मोहिमेच्या आधारे एका सरकारी कंपनीने इतिहास रचलाय.
ही सरकारी कंपनी दुसरी कोणती नसून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे. शेअर बाजारात कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठलाय. एचएएल ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात जुनी एरोस्पेस कंपन्यांपैकी एक आहे. जिनं इस्रोला चंद्रयान ३ च्या चंद्र मोहिमेत खूप मदत केली आहे. जर चंद्रयान ३ चंद्रावर उतरण्यात यशस्वी झालं तर जगाच्या नकाशावर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा प्रभाव अधिक मजबूत होईल.
कंपनीनं रचला इतिहासहिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीमुळे कंपनीच्या शेअरनं विक्रमी उच्चांक गाठलाय. बुधवारी कंपनीचा शेअर ४,०२४ रुपयांवर पोहोचला. सुमारे २५ दिवसांत कंपनीने आपला विक्रम मोडला. यापूर्वी ३१ जुलै रोजी कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला होता.
कंपनीला ४४०० कोटींचा फायदाशेअर्सच्या वाढीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्येही वाढ झाली आहे. मंगळवारी बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचं मार्केट कॅप १,३४,५५७.५२ कोटी रुपये होते. दुपारच्या सुमारास कंपनीचा शेअरनं ४,०२४ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला तेव्हा कंपनीचं मार्केट कॅप १,३०,११०.१७ कोटी रुपये झाले. याचा अर्थ आज काही तासांत कंपनीनं ४,४४७.३५ कोटी रुपये कमावले. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात कंपनीचा शेअर ४०४३ रुपयांवर बंद झाला.