२३ ऑगस्ट २०२३. बुधवारी संध्याकाळची वेळ... अनेकांच्या हृद्याची धडधड वाढली होती. चंद्रयान-३च्या विक्रम लँडरच्या सॉफ्टलँडिंगच्या लाइव्ह स्ट्रिमिंगकडे असंख्य लोक डोळे लावून बसले होते. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी इस्रोमधील शास्त्रज्ञांनी घेतलेल्या अथक परिश्रमांना गोड फळ आले. चंद्रयान-३चे विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर हे चंद्राच्या पृष्ठभागावर दाखल झालं असून आता तेथील सखोल संशोधनाला सुरुवात झाली आहे. या चंद्रयान मोहिमेत गोदरेज एअरोस्पेसनंही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भारताच्या या चांद्रयान-३ मोहिमेत गोदरेज एरोस्पेस कंपनीनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या मोहिमेशी कंपनीचा विशेष संबंध आहे. वास्तविक गोदरेज एअरोस्पेस हे गोदरेज आणि बॉयसचे व्यावसायिक युनिट आहे. ही गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी आहे. गोदरेज एअरोस्पेस हे अंतराळ विश्वातील एक प्रमुख नाव आहे. ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) भागीदार आहे.
कंपनीचं विशेष कनेक्शनचंद्रयान ३ मोहिमेशी गोदरेज एअरोस्पेसचं विशेष कनेक्शन आहे. गोदरेज एअरोस्पेस इस्रोच्या स्पेस लाँच व्हेइकलसाठी लिक्विड इंजिन तयार करणारी एकमेव कंपनी आहे. कंपनी इंजिनशिवाय सॅटलाईट अॅप्लिकेशन्ससाठी कॉम्प्लेक्स थ्रस्टर्सही सप्लाय करते. यासोबतच लाँच व्हेईकलसाठी क्रायोजेनिक आणि सेमी क्रायोजेनिक इंजिनसाठी कॉम्प्लेक्स असेंबलिगही करते.
जगभरातून कौतुकअमेरिका : ‘चंद्रयान-३चं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल इस्रोचं अभिनंदन. चंद्रावर अंतराळ यानाचे यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनल्याबद्दल भारताचे अभिनंदन! या मोहिमेमध्ये तुमचा भागीदार असल्याचा आम्हाला आनंद आहे,’ अशी पोस्ट नासाचे बिल नेल्सन यांनी सोशल मीडियावर केली.
युरोप : अविश्वसनीय! तमाम भारतवासीयांचे आणि इस्त्रोचे अभिनंदन! नवे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याचा आणि दुसऱ्या खगोलीय पिंडावर भारताचं पहिलं सॉफ्ट लँडिंग साध्य करण्याचा किती चांगला मार्ग आहे. खूप छान, मी पूर्णपणे प्रभावित झालो आहे, अशा शब्दांत युरोपियन स्पेस एजन्सीच्या महासंचालकांनी कौतुक केलं. पुढे, आम्हीदेखील यातून खूप चांगले धडे शिकत आहोत, असंही लिहिलं.