Join us

१ जुलैपासून होणार मोठे बदल! थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 3:48 PM

१ जुलैपासून महत्वपूर्ण बदल होणार आहेत.

१ जुलैसाठी फक्त तीनच दिवस राहिले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. सुरुवातीपासूनच अनेक गोष्टी बदलण्याची शक्यता आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेबरोबरच यावेळीही काही बदल अपेक्षित आहेत. या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरचे दर ते सीएनजी-पीएनजीच्या किमतींचा समावेश आहे.

श्रीसिमेंटवर 23000 कोटींच्या करचोरीचा आरोप; एका झटक्यात 9200 कोटी बुडाले

एलपीजी सिलेंडर

तेल कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला दरात बदल करत असतात. एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यावेळी व्यावसायिक सोबतच १४ किलो एलपीजी सिलिंडरचे दरही कमी होण्याची शक्यता आहे.

क्रेडिट कार्ड अटी

१ जुलै २०२३ पासून परदेशात क्रेडिट कार्डच्या खर्चावर TCS शुल्क आकारण्याची तरतूद असू शकते. या अंतर्गत, जर तुमचा खर्च ७ लाख किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला २० टक्के TCS भरावा लागेल. शिक्षण आणि औषधोपचाराशी संबंधित खर्चावर ही फी ५ टक्के करण्यात येणार आहे. परदेशात शिक्षणासाठी कर्ज घेतलेल्या करदात्यांना ७ लाखांपेक्षा जास्त रकमेवर ०.५ टक्के टीसीएस फी भरावी लागेल.

CNG-PNG 

सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीतील बदल महिन्याच्या १ तारखेला किंवा एलपीजीप्रमाणे पहिल्या आठवड्यात दिसून येतात. दिल्ली, मुंबई आणि इतर शहरातील तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सीएनजी-पीएनजीचे दर बदलतात. आता जुलैमध्ये किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :गॅस सिलेंडरमहागाई