Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएफच्या नियमांमध्ये झाले बदल; आजारी पडल्यास उपचारासाठी दुप्पट पैसे काढता येणार

पीएफच्या नियमांमध्ये झाले बदल; आजारी पडल्यास उपचारासाठी दुप्पट पैसे काढता येणार

ईपीएफओने फॉर्म ३१ च्या पॅरा ६८जे अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 07:46 AM2024-04-19T07:46:42+5:302024-04-19T07:47:24+5:30

ईपीएफओने फॉर्म ३१ च्या पॅरा ६८जे अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे.

Changes in PF rules In case of illness, double the amount can be withdrawn for treatment | पीएफच्या नियमांमध्ये झाले बदल; आजारी पडल्यास उपचारासाठी दुप्पट पैसे काढता येणार

पीएफच्या नियमांमध्ये झाले बदल; आजारी पडल्यास उपचारासाठी दुप्पट पैसे काढता येणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) चे सदस्य आजारी पडल्यास उपचारासाठी त्यांच्या पीएफ खात्यातून अधिक पैसे काढू शकतील. ईपीएफओने फॉर्म ३१ च्या पॅरा ६८जे अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे. ही मर्यादा ५० हजार  रुपयांवरून १ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

ईपीएफओचा फॉर्म ३१ विविध कारणांसाठी पीएफ खात्यातून वेळेपूर्वी पैसे काढण्यासाठी वापरला जातो. यामध्ये विविध परिच्छेदांमध्ये विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लग्न, घर बांधणे, घर खरेदी करणे, उपचारासाठी पैसे काढणे आदी कामांचा समावेश आहे.

फॉर्म ३१ काय असतो? 
फॉर्म ३१ द्वारे विविध कारणांसाठी पैसे काढता येतात. यात वेगवेगळी कलमे आहेत ज्या अंतर्गत विविध कारणांसाठी पैसे काढले जातात. उदाहरणार्थ, पॅरा ६८बी अंतर्गत, विशेष प्रकरणांमध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे काढले जाऊ शकतात.

रक्कम काढण्याची अट काय? सही कुणाची लागते?
- फॉर्म ३१ मधील पॅरा ६८जे उपचारासाठी आंशिक रक्कम काढण्याची परवानगी देतो. त्याची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. मात्र, नवीन नियमांनुसार, कर्मचारी ६ महिन्यांचे बेसिक आणि डीए किंवा ईपीएफ योगदान आणि मिळालेल्या व्याजासह (जे कमी असेल) त्याचा हिस्सा काढू शकत नाही.
- या रकमेपेक्षा जास्त रक्कम, त्यांच्या पीएफ खात्यात (एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम) असल्यासच ते ही रक्कम काढू शकतात. जर कोणत्याही सदस्याला पैसे काढायचे असतील तर त्यांना फॉर्म ३१ सोबत प्रमाणपत्र सी जोडावे लागेल. यात कर्मचारी आणि डॉक्टरची स्वाक्षरी असेल. 

Web Title: Changes in PF rules In case of illness, double the amount can be withdrawn for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.