मुंबई : बॉलीवूडमध्ये १९९० चे दशक असे होते जेव्हा क्लीन शेव्ह असलेला एखादा स्मार्ट हीरो पडद्यावर एंट्री करायचा तेव्हा प्रेक्षक अक्षरश: थिएटर डोक्यावर घेत. अनेक तरुण तरुणी हीरोंच्या या ‘लुक्स’वर फिदा असायचे. असे म्हणतात की, काळासोबत फॅशनही बदलत जातात. म्हणूनच की काय बॉलीवूड स्टार आणि क्रिकेटपटू यांच्या दाढीच्या नव्या स्टाईलची भुरळ तरुणाईला पडली आहे. दाढी-मिशांची काळजी घेण्यासाठी लागणाºया प्रॉडक्टसची बाजारपेठ थोडीथोडकी नव्हे, तर १०० कोटींवर पोहचली आहे.हँडसम दिसण्यासाठी आता पुरुषही विशेष काळजी घेत असल्याचे दिसत आहे. दाढी-मिशा ठेवण्याची क्रेझ या दोन वर्षात वाढली आहे. मग त्याला कारण बॉलीवूडमधील हीरो असोत अथवा क्रिकेटपटू. अगदी मोठ्या शहरांपासून ते गावापर्यंत ही क्रेझ पहायला मिळत आहे. मोठ्या शहरातून तर असे काही क्लब सुुरु झाले आहेत जे दाढी-मिशा ठेवणाºया तरुणांना, पुरुषांना सल्ला देतात.दाढी- मिशांची काळजी घेण्यासाठी लागणारे प्र्रोडक्ट्स बनविणारी कंपनी बिअर्डोचे संस्थापक आशुतोष वलानी सांगतात की, ही तर सुरुवात आहे. अद्याप या क्षेत्रातील बाजारपेठेने उलाढालीत वेग घेतलेला नाही. आगामी काही वर्षे तरी ही क्रेझ कायम राहील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.आशुतोष म्हणाले की, १९९० च्या दशकात क्लीन शेव्ह राहणे ही स्टाइल झाली होती. यात आता बदल होत असून दाढी - मिशा ठेवण्याची स्टाइल वाढत आहे. नव्हे, ही आता लाइफस्टाइल बनू पाहत आहे. केवळ दोन वर्षांतच या प्रोडक्ट्सचे मार्केट १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यावरुन हे लक्षात येईल की, पुरुष स्वत: च्या लुक्सकडे अधिक लक्ष देत आहेत.पुरुषांच्या सौंदर्यप्रसाधनांत ४३ टक्के वाढपुरुषांच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये गत पाच वर्षात ४२ टक्के वाढ झाली आहे. पुरुषांच्या या प्रोडक्ट्ससची बाजारपेठ आगामी काही वर्षात ५००० कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. इमामीचे संचालक हर्षा व्ही. अग्रवाल यांनी सांगितले की, पुरुष आता आपल्या लुक्सकडे विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे या बाजारपेठेला महत्व प्राप्त झाले आहे.
बदलत्या स्टाइल स्टेटमेंटमुळे दाढी-मिशांच्या प्रोडक्ट्सची उलाढाल १०० कोटी रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:20 AM