Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट

Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट

Share Market Live Update :  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात हाहाकार माजला आहे. सेन्सेक्समध्ये १००० अंकांपेक्षाही अधिक घसरण झालीये.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 01:11 PM2024-09-30T13:11:36+5:302024-09-30T13:11:47+5:30

Share Market Live Update :  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात हाहाकार माजला आहे. सेन्सेक्समध्ये १००० अंकांपेक्षाही अधिक घसरण झालीये.

chaos in Stock market Sensex hits over 1000 points Lower circuit for shares of 279 companies live updates | Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट

Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट

Share Market Live Update :  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात हाहाकार माजला आहे. सेन्सेक्समध्ये १००० अंकांपेक्षाही अधिक घसरण झालीये. तर निफ्टी २५,९०० च्या खाली व्यवहार करत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज एक टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली. बँक निफ्टीमध्येही आज एका टक्क्यापेक्षा अधिक घसरण झाली. तर दुसरीकडे बीएसईमधील २७९ कंपन्यांच्या समभागांमध्ये लोअर सर्किटही लागलंय.

दुपारी एकच्या सुमारास सेन्सेक्समध्ये १०३० अंकांची घसरण होऊन तो ८४५३७ अंकांवर पोहोचला. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये २९१ अंकांची घसरण होऊन २५८८७ वर व्यवहार करत होता. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटी आणि फायनान्शिअल सेक्टरच्या शेअर्समध्ये झालेली घसरण हे या घसरणीचे मुख्य कारण आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक यांच्याच शेअर्समुळे सेन्सेक्स ५३५ अंकांनी घसरला होता. याशिवाय भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, टीसीएस, इन्फोसिस आणि टाटा मोटर्स या प्रमुख शेअर्समध्येही घसरण दिसून आली.

काय म्हणाले एक्सपर्ट?

अलीकडच्या काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे (एफआयआय) लक्ष चीनकडे वळलं असून सरकारनं आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अनेक प्रोत्साहनात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. परिणामी, चिनी बाजारपेठांमध्ये झपाट्यानं वाढ होत असून, भारतीय बाजारांवर दबाव निर्माण झाला असल्याचं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढून चिनी बाजारात गुंतवले, ज्यामुळे सेन्सेक्सवर दबाव आला. ब्लू-चिप सीएसआय ३०० निर्देशांक ३ टक्क्यांनी वधारला, तर शांघाय कंपोझिट ४.४ टक्क्यांनी वधारला. याव्यतिरिक्त, चीनच्या मध्यवर्ती बँकेने विद्यमान गृहकर्जासाठी तारण दर कमी करण्याची योजना जाहीर केली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचंही एक्सपर्ट्स म्हणाले.

Web Title: chaos in Stock market Sensex hits over 1000 points Lower circuit for shares of 279 companies live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.