Lokmat Money > बिझनेस न्यूज > Charges for Aadhaar Services : आधार कार्डच्या कोणत्या सेवांसाठी शुल्क द्यावे लागते तर कोणत्या नाही? वाचा सविस्तर...

Charges for Aadhaar Services : आधार कार्डच्या कोणत्या सेवांसाठी शुल्क द्यावे लागते तर कोणत्या नाही? वाचा सविस्तर...

Charges for Aadhaar Services : जर तुम्हाला आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील किंवा तुमचे हरवलेले आधार कार्ड पुन्हा मिळवायचे असल्यास ऑनलाइन सुविधेद्वारे तुम्हाला हा फायदा मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 12:04 PM2022-02-05T12:04:02+5:302022-02-05T12:48:27+5:30

Charges for Aadhaar Services : जर तुम्हाला आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील किंवा तुमचे हरवलेले आधार कार्ड पुन्हा मिळवायचे असल्यास ऑनलाइन सुविधेद्वारे तुम्हाला हा फायदा मिळतो.

charges for aadhaar services which services of aadhaar have to be charged which services are free check here | Charges for Aadhaar Services : आधार कार्डच्या कोणत्या सेवांसाठी शुल्क द्यावे लागते तर कोणत्या नाही? वाचा सविस्तर...

Charges for Aadhaar Services : आधार कार्डच्या कोणत्या सेवांसाठी शुल्क द्यावे लागते तर कोणत्या नाही? वाचा सविस्तर...

नवी दिल्ली :  आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक असे डॉक्युमेंट बनले आहे, जे प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आहे. आधार कार्ड शिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार कार्डच्या सर्विसेजबाबत आपल्या ग्राहकांना सतत अलर्ट करत असते.

जर तुम्हाला आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील किंवा तुमचे हरवलेले आधार कार्ड पुन्हा मिळवायचे असल्यास ऑनलाइन सुविधेद्वारे तुम्हाला हा फायदा मिळतो. परंतु काही सेवा अशा आहेत, ज्यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर्समध्ये (Common Services Centers) जावे लागते.

आधार कार्ड जारी करणारी संस्था  UIDAI आधार कार्ड देताना 50 रुपये शुल्क घेते. तसेच आधारमध्ये अपडेटसाठी वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळा शुल्क द्यावा लागतो. जर तुम्ही तुमचे बायोमेट्रिक अपडेट करत असाल, तर 50 रुपये शुल्क आकारले जाते. याशिवाय, डेमोग्राफिकची कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी 50 रुपयांचे शुल्क घेतले जाते. जर एखादा व्यक्ती पुन्हा आधार कार्ड घेत असेल, तर त्याला चार्ज द्यावा लागतो. 

पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhar Card) साठी 50 रुपये चार्ज घेतला जातो. मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठीही 50 रुपये भरावे लागतात. तसंच KYC करण्यासाठी UIDAI कडून 30 रुपये घेतले जातात. वरील कोणत्याही कामासाठी तुमच्याकडे कोणी अधिक पैसे मागत असेल, तर 1947 वर कॉल करुन तक्रार करू शकता. किंवा help@uidai.gov.in या वेबसाइटवरही तुमची तक्रार दाखल करू शकता.

या सेवा मोफत...
आधार कार्डमध्ये काही अपडेट करण्यासाठी पैसे घेतले जात नाहीत. आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता ऑनलाइन बदलता येतो. यासाठी पैसे भरावे लागत नाहीत. तसेच आधारची ई-कॉपी घेत असाल, तरीही यासाठी कोणताही चार्ज भरावा लागत नाही. तसंच एनरोलमेंट नंबर आणि पहिल्यांदा बायोमेट्रिक माहिती अपडेट करताना कोणताही चार्ज द्यावा लागत नाही.
 

Web Title: charges for aadhaar services which services of aadhaar have to be charged which services are free check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.