Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘यूपीआय’वरील व्यवहारांवर आकारणार शुल्क

‘यूपीआय’वरील व्यवहारांवर आकारणार शुल्क

युनिफाईड पेमेंटस् इंटरफेस (यूपीआय) या यंत्रणेचा वापर करून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय एचडीएफसी बँकेने जाहीर केला

By admin | Published: June 8, 2017 12:13 AM2017-06-08T00:13:17+5:302017-06-08T00:13:17+5:30

युनिफाईड पेमेंटस् इंटरफेस (यूपीआय) या यंत्रणेचा वापर करून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय एचडीएफसी बँकेने जाहीर केला

Charges incurred on 'UPI' transactions | ‘यूपीआय’वरील व्यवहारांवर आकारणार शुल्क

‘यूपीआय’वरील व्यवहारांवर आकारणार शुल्क


मुंबई : युनिफाईड पेमेंटस् इंटरफेस (यूपीआय) या यंत्रणेचा वापर करून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय एचडीएफसी बँकेने जाहीर केला आहे. आपल्या खातेदारांना एक ई-मेल पाठवून बँकेने ही माहिती कळविली आहे. १0 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. त्यानुसार १ रुपया ते २५ हजारांपर्यंतच्या व्यवहारांवर ३ रुपये शुल्क लागेल. २५ हजार ते १ लाखांपर्यंतच्या व्यवहारावर ५ रुपये शुल्क लागेल. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (नेफ्ट) यंत्रणेवरून छोट्या रकमांचे व्यवहार करणे तुलनेत स्वस्त आहे. नेफ्टवर १0 हजारांपर्यंतच्या व्यवहारांसाठी २.५ रुपये, तर त्यावरील व्यवहारांसाठी ५ रुपये शुल्क लागते.

Web Title: Charges incurred on 'UPI' transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.