Join us  

हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज; दिवाळीनिमित्त विमान भाडे 20-25 टक्क्यांनी कमी झाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 4:11 PM

Cheap Air Tickets : मुंबई-दिल्ली, बंगळुरू-कोलकातासह अनेक मार्गावरील भाडे कमी झाले आहे.

Air Tickets : वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवळी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीनिमित्त तुम्ही हवाई प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमानाच्या सरासरी भाड्यात मोठी सूट मिळणार आहे. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सीगोच्या अहवालानुसार, देशांतर्गत मार्गावरील सरासरी विमान भाडे 20-25 टक्क्यांनी घटले आहे. या किमती 30 दिवसांच्या अॅडव्हान्स बुकिंगवर लागू असतील. 

दिवाळीनिमित्त अनेक देशांतर्गत मार्गावरील सरासरी विमान भाडे गेल्या वर्षीच्या तुलनेत 20-25 टक्क्यांनी कमी झाले आहे. वाढलेली क्षमता आणि अलीकडे तेलाच्या किमतीत झालेली घसरणीमुळे किमती कमी झाल्याची माहिती आहे. कोणत्या मार्गावर किती भाडे कमी झाले, ते पाहा...

  • या वर्षी बंगळुरू-कोलकाता फ्लाइटचे सरासरी विमान भाडे 38 टक्क्यांनी घसरून 6,319 रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षी 10,195 रुपये होते.
  • चेन्नई-कोलकाता मार्गावरील तिकिटाचे भाडे 8,725 रुपयांवरून 36 टक्क्यांनी घसरून 5,604 रुपयांवर आली आहे. 
  • मुंबई-दिल्ली फ्लाइटचे सरासरी भाडे 34 टक्क्यांनी घसरुन 8,788 रुपयांवरून 5,762 रुपयांवर आले आहे. 
  • तर, दिल्ली-उदयपूर मार्गावरील तिकिटांचे दर 11,296 रुपयांवरून 34 टक्क्यांनी घसरून 7,469 रुपयांवर आले आहेत.
  • याशिवाय, दिल्ली-कोलकाता, हैदराबाद-दिल्ली आणि दिल्ली-श्रीनगर मार्गांवरील भाडे 32 टक्क्यांनी कमी झाले आहे.
टॅग्स :विमानदिवाळी 2023व्यवसायट्रॅव्हल टिप्स