ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - जर तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तरी निराश होण्याची गरज नाही. आता तुम्ही स्मार्टफोनच्या किंमतीतही लॅपटॉप खरेदी करू शकतात.
या लॅपटॉपमध्ये तुम्हाला सर्व आधुनिक फिचर मिळणार नाहीत मात्र, आवश्यक तितकी सर्व कामं तुम्ही यावर नक्कीच करू शकतात. शाळा, कॉलेज आणि ऑफिससंबंधी सर्वच कामं यावर अगदी आरामात करता येतील. अशाच 8 लॅपटॉपविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
RDP ThinBook लॅपटॉप हा ऑगस्ट 2016 मध्ये लॉन्च झाला होता. 14 इंच स्क्रीन असलेला हा त्यावेळचा सर्वात स्वस्त लॅपटॉप होता. हा लॅपटॉप Windows 10 Home OS आणि Intel Atom x5-Z8300 SoC या ऑपरेटिंग सिस्टिमला सपोर्ट करतो. यामध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी एक्सपांडेबल स्टोरेज असून 10,000mAh इतकी बॅटरी आहे. या लॅपटॉपची किंमत 9 हजार 999 रूपये इतकी आहे.
Lenovo IdeaPad 100S हा आणखी एक लॅपटॉप बाजारात उपलब्ध आहे. 11.6 इंच HD डिस्प्ले असलेला हा लॅपटॉप Windows 10 OS ला सपोर्ट करतो. यामध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी एक्सपांडेबल स्टोरेज असून 2 सेलची बॅटरी असलेल्या या लॅपटॉपची बॅटरी 39 तासांपर्यंत राहते असं कंपनीने सांगितलं आहे. या लॅपटॉपची किंमत 14 हजार 999 रूपये इतकी आहे.
iBall Exemplaire CompBook
डिस्प्ले- 14 इंच HD डिस्प्ले
ऑपरेटींग सिस्टीम - Windows 10
बॅटरी - 10,000mAh
रॅम- 2GB
मेमरी- 32GB मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते
किंमत- 13 हजार 999 रूपये
Micromax Canvas LT666 LapTab
डिस्प्ले- 10.1 इंच HD डिस्प्ले
ऑपरेटींग सिस्टीम -Windows 10
रॅम- 2GB
मेमरी- 32GB मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते
किंमत- 14 हजार 999 रूपये
iBall Excelance CompBook
डिस्प्ले- 11.6 इंच HD डिस्प्ले
ऑपरेटींग सिस्टीम -Windows 10
रॅम- 2GB
मेमरी- 32GB मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते
बॅटरी - 10,000mAh
किंमत- 9 हजार 999 रूपये
-Micromax Canvas Lapbook L1160
डिस्प्ले- 11.6 इंच डिस्प्ले
ऑपरेटींग सिस्टीम -Windows 10
रॅम- 2GB
मेमरी- 32GB मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते
बॅटरी - 4100mAh
किंमत- 10 हजार 499 रूपये
-Acer One 10 S1002
डिस्प्ले- 10.1 इंच WXGA डिस्प्ले
ऑपरेटींग सिस्टीम -Windows 8.1 ते Windows 10
रॅम- 2GB
बॅटरी - 8400mAh
- Micromax Canvas L1161
डिस्प्ले- 11.6 इंच HD डिस्प्ले
ऑपरेटींग सिस्टीम -Windows 10
रॅम- 2GB
मेमरी- 32GB इंटरनल मेमरी, मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते
बॅटरी - 4100mAh
किंमत- 10 हजार 499 रूपये