लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नोव्हेंबर २०२४ मध्ये घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर कमी होऊन १.८९ टक्के टक्के झाला. हा मागील ३ महिन्यांचा निचांक आहे. सरकारच्या वतीने सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाईचा दर २.३६ टक्के होता. खाद्य वस्तूंच्या किमती घसरल्यामुळे घाऊक महागाई कमी झाली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर ०.३९ टक्के होता. नोव्हेंबरमध्ये घाऊक खाद्य वस्तूंचा महागाईचा दरही कमी होऊन ८.६३ टक्के झाला आहे. ऑक्टोबरमध्ये तो १३.५४ टक्के होता. भाज्यांचे दर घसरल्यामुळे ही महागाई कमी झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये ६३.०४ टक्के असलेली भाज्यांची महागाई नोव्हेंबरमध्ये घसरून २८.५७ टक्क्यांवर आली. बटाट्यांची महागाई सर्वाधिक ८२.७९ टक्के राहिली. कांद्यांची महागाई मात्र २.८५ टक्क्यांवर घसरली.
वस्तुनिहाय घाऊक महागाईचा दर
वस्तू ऑक्टोबर नोव्हेंबर
खाद्य वस्तू १३.५४% ८.६३%
इंधन व ऊर्जा -५.७९% -५.८३%
उत्पादन १.५०% २%
बटाटे ७८.७३% ८२.७९%
कांदे ३९.२५% २.८५%
भाज्या ६४.०४% २८.५७%
अन्नधान्ये ७.९१% ७.८१%
इंधन महागाई -५.८३ %
इंधन आणि ऊर्जा क्षेत्राचा महागाई या क्षेत्रांचा महागाई दर नोव्हेंबरमध्ये -५.८३ टक्के राहिला. ऑक्टोबरमध्ये महागाई दर -५.७९ टक्के होता. या महिन्यात वस्तू उत्पादन क्षेत्रातील महागाई २ टक्क्यांवर राहिली. ऑक्टोबरमध्ये ती १.५ टक्के होती.